Punjab News: खलिस्तानी समर्थक अमृतपालविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी ; पोलिसांची शोधाशोध सुरूच!

Amritpal Singh : अमृतपाल सिंगचे अनेक व्हिडीओ आले समोर..
Amritpal Singh
Amritpal SinghSarkarnama
Published on
Updated on

Punjab Police: पोलीस ज्याचा शोध घेत आहेत त्या खलिस्तानी समर्थक आणि वारिस पंजाब दे संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तो एका व्यक्तिसोबत मोटारसायकलवर जाताना दिसत आहे. अमृतपाल हा एका कारमधून उतरतो आणि मोटारसायकलवरून निघून जातो. पोलिसांनी आता अमृतपालविरूद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलेले आहे. आतापर्यंत १५४ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच एनआयएची पथक पंजाबमध्ये दाखल झाली असून तपास सुरु आहे.

Amritpal Singh
Punjab Police : अमृतपाल सिंगचे सात फोटो, दोन video व्हायरल ; क्लीन शेव-दाढी-पगडीमधील..

अमृतपाल सिंग याचा पंजाब पोलिस शोध घेत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी फरार अमृतपाल यांचे अनेक व्हिडिओ आणि छायचित्र प्रसिद्ध केले आहेत. व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून जनतेने त्याला पकडण्यासाठी पोलिसांना मदत करा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पंजाब पोलिसांनी अमृतपालचे विविध छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहेत. यात तो क्लीन शेव ते दाढी-पगडी अशी विविध छायाचित्रे पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत. एका व्हिडिओमध्ये तो दुचाकीवर बसलेला आहे, तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये तो एका कारमधून जात असल्याचे दिसते. पंजाब पोलिस त्याचा राज्यभर शोध घेत आहेत.

Amritpal Singh
Karnataka Election 2023 : कर्नाटकमध्ये 'आप' बिघडवणार भाजप, काँग्रेसचा खेळ ; या बड्या नेत्यांना उमेदवारी

पंजाबचे पोलिस महानिरीक्षक सुखचैन सिंह गिल यांनी हे दोन व्हिडिओ आणि सात छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत त्यांचा शोध घेण्यात येत आहे.एनआयएची 8 पथके पंजाबमध्ये पोहोचली असून या पथकांनी अमृतसर, तरनतारन, जालंधर, गुरुदासपूर, जालंधर जिल्ह्यात तपास सुरू केला आहे.

अमृतपालला बळजबरीने कोठडीत ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. अमृतपाल कुठे आहे, आता कुणालाच माहिती नाही. मात्र, पोलिसांनी त्यांना आपल्या ताब्यात ठेवल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. दुसरीकडे पोलिसांच्या वतीने व NIA तपास यंत्रणेकडून अमृतपालच्या कुटुंबीयांच्या खाते तपासले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com