Amit Shah-Mohan Bhagwat : गृहमंत्री शाह अन् सरसंघचालक मोहन भागवत एकाच व्यासपीठावर

Amit Shah-Mohan Bhagwat Aandman Nikobar Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हा दुसरा अंदमान निकोबार दौरा असून यापूर्वी यापूर्वी त्यांनी जानेवारी 2023 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 126 व्या जयंती निमित्त आले होते. तर मोहन भागवत यांनी सरसंघचालकपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे.
Amit Shah Mohan Bhagwat .jpg
Amit Shah Mohan Bhagwat .jpgSarkarnama
Published on
Updated on

Aandman Nicobar News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वीच बेंगलुरू येथील एका कार्यक्रमात खळबळ उडवून देणारं विधान केलं होतं. यावेळी त्यांनी संघ कोणत्याही व्यक्ती किंवा एका राजकीय पक्षाचे समर्थन करत नसल्याचं म्हटलं होतं. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. याचदरम्यान,आता अंदमान निकोबारमध्ये मोठी घडामोड घडली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) अन् राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे अंदमान निकोबारमध्ये शुक्रवारी (ता.12) एकाच व्यासपीठावर आले आहेत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण यावेळी करण्यात आलं. तसेच सावरकरांच्या ओजस्वी लेखणी आणि स्वातंत्र्य संग्रामाच्या संघर्षाचं प्रतीक असलेल्या ‘सागरा प्राण तळमळला’ कवितेला 116 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

अंदमान निकोबार येथील या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, सावरकरांची भूमिका साकारणारा सिनेअभिनेता रणदीप हुड्डा,शरद पोंक्षे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हा दुसरा अंदमान निकोबार दौरा असून यापूर्वी यापूर्वी त्यांनी जानेवारी 2023 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 126 व्या जयंती निमित्त आले होते. तर मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी सरसंघचालकपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे.

Amit Shah Mohan Bhagwat .jpg
ZP Teachers news : शिक्षकांसाठी महत्वाची बातमी; ZP शाळांमधील बदल्यांसाठीचे सर्व GR रद्द करण्याची सरकारची तयारी, मंत्र्यांची विधानसभेत माहिती

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी पुकारलेल्या लढ्यावेळी त्यांना तत्कालीन इंग्रज सरकारनं अंदमान निकोबारमध्ये काळापाण्याची शिक्षा भोगण्यासाठी पाठवलं होतं. त्यावेळी त्यांनी शिक्षा भोगत असतानाच ज्या काही अजरामर कवितांच्या रचना केल्या, त्यापैकीच एक म्हणजे 'ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला ही एक आहे.

भाजपची मातृसंस्था म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख राहिली आहे. पण याच संघाच्या सरसंघचालकांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात राजकीय पक्षांबाबतची आपली भूमिका स्पष्ट करताना केलेल्या विधानामुळे भाजपची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वीच खळबळजनक विधान केलं होतं.

Amit Shah Mohan Bhagwat .jpg
Maharashtra politics: विरोधी पक्षनेतेपदासाठी जोरदार हालचाली; उद्धव ठाकरेंनी घेतली नार्वेकरांची भेट, अंतिम निर्णय होणार?

भागवत यांनी त्यावेळी संघ कोणत्याही व्यक्ती किंवा राजकीय पक्षाचे समर्थन करत नाही,तर धोरणांचे समर्थन करतो. आम्ही कोणा एका पक्षाचे समर्थन करत नसून धोरणांचे समर्थन करतो. आम्ही राष्ट्रनीतीचे समर्थक आहोत,राजनीतीचे नाही,असं म्हटलं होतं.

आम्ही निवडणुकीच्या राजकारणात सहभाग घेत नाही.संघ समाजाला एकजुट करण्याचे काम करतो आणि राजकारण विभाजनकारी असेत.आम्ही धोरणाचे समर्थन करतो.याचे उदाहरण द्यायचे झाले तर, आम्हाला अयोध्येत राम मंदिर हवे होते.त्यामुळे आमचे स्वयंसेवक त्याच्या उभारणीसाठी उभे राहिले. भाजपने हा मुद्दा उचलून धरला.जर काँग्रेसनेही याचे समर्थन केले असते तर आमच्या स्वयंसेवकांनी त्या पक्षाला मते दिली असती, असंही भागवत यांनी यावेळी म्हटलं होतं.

सरसंघचालक यांनी नवी भूमिका मांडतानाच कोणत्याही एका विशिष्ट पक्षासोबत आमचे विशेष संबंध नाहीत. कोणताही एक पक्ष आमचा नाही,सर्व पक्ष आमचे आहेत,कारण ते भारतीय पक्ष आहेत. आमचे काही विचार आहेत.देश एका विशिष्ट दिशेने पुढे जावा,असं आम्हाला वाटतं.जे लोक देशाला त्या दिशेनं पुढे घेऊन जातील, आम्ही त्यांचं समर्थन करू, असं परखड मतही भागवत यांनी व्यक्त केलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com