Maharashtra politics: विरोधी पक्षनेतेपदासाठी जोरदार हालचाली; उद्धव ठाकरेंनी घेतली नार्वेकरांची भेट, अंतिम निर्णय होणार?

Opposition leader post News : नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेता निवडीबाबत चर्चा केली.
Rahul Narvekar, Uddhav Thackeray
Rahul Narvekar, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत येऊन एक वर्षाचा कालावधी झाला आहे. त्यानंतरही विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची निवड महायुती सरकारकडून करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेता निवडीचे अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकराला असल्याचे स्पष्ट करीत त्याबाबतचा निर्णय ते घेतील असे सांगितले. त्यामुळे नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. विरोधी पक्षनेता निवडीबाबत यावेळी दोघांमध्ये सुमारे 25 मिनिट चर्चा झाली. त्यामुळे लवकरच याबाबत अंतिम निर्णय होणार? असल्याचे समजते.

हिवाळी अधिवेशनासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे गुरुवारी दुपारी विधिमंडळात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी हिवाळी अधिवेशनाबाबत रणनीती आखली आहे. नागपूरमध्ये पोहोचताच त्यांनी मोठी राजकीय चाल खेळत शिवसेनेच्या आमदारांची तातडीने बैठक घेत काही सूचना केल्या. त्यानंतर विधिमंडळ पक्ष कार्यालयात उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारच्या कारभारावर चौफेर टीका केली.

Rahul Narvekar, Uddhav Thackeray
Pune BJP: पुणे महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी भाजपतर्फे तब्बल 2 हजार 350 इच्छुकांची तयारी; उद्यापासून धडधड वाढणार

शुक्रवारी सकाळी उद्धव ठाकरे यांनी काहीकाळ विधानसभेच्या कामकाजात सहभाग नोंदवला. विरोधीपक्ष नेतेपदासाठी जोरदार हालचाली सुरु आहेत. त्यानंतर दुपारच्यावेळी त्यांनी विधिमंडळातील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली. . या बैठकीवेळी त्यांच्यासोबत आमदार भास्कर जाधव (Bhaskar jadhav), आदित्य ठाकरे आमदार मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेता निवडीबाबत सविस्तर चर्चा केली, असल्याचे समजते. या भेटीनंतर विरोधीपक्ष नेतेपदाचा अंतिम निर्णय लवकरच होणार असल्याचे समजते.

Rahul Narvekar, Uddhav Thackeray
Shivsena News : एकनाथ शिंदेंनी नागपुरात बसून हलविली बालेकिल्ल्यातील सुत्रं; महापालिका निवडणुकीसाठी ठरली रणनीती...

विरोधी पक्षनेतेपद हे घटनात्मक पद आहे आणि ते रिक्त ठेवणे लोकशाहीसाठी योग्य नाही. त्यांनी वारंवार या नियमांबाबत लवचिक भूमिका घेण्याची मागणी केली आहे, कारण यापूर्वी कमी संख्याबळ असलेल्या पक्षांनाही हे पद मिळाले असल्याचे काही दाखले उद्धव ठाकरे यांनी दिले असल्याचे समजते.

Rahul Narvekar, Uddhav Thackeray
Pune NCP Alliance : शरद पवारांच्या सूचनेनंतर पुण्यातील तंटा मिटवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष मैदानात उतरणार

दरम्यान, विधानसभा व विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेता निवडीच्या मागणीकडे महायुती सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्ष नेता निवडीचा निर्णय अध्यक्ष व सभापती घेतील, असे सांगून निवडीचा चेंडू त्यांच्या कोर्टात ढकलला जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीच याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ते आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Rahul Narvekar, Uddhav Thackeray
Congress Thackeray Alliance : राजकारणातील आजची सर्वात मोठी बातमी; काँग्रेसच्या देशपातळीवरील मातब्बर नेत्याचे ठाकरेंशी गुफ्तगू, मनसेवर फैसला?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com