Jagan Mohan Vs Sharmila : भाच्याच्या साखरपुड्यात जगनमोहन यांनी बहिणीकडं बघितलंही नाही; राजकीय वैर वाढलं

YS Sharmila : वाय. एस. शर्मिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आहेत.
JaganMohan Vs Sharmila
JaganMohan Vs SharmilaSarkarnama
Published on
Updated on

Andhra Pradesh News : आंध्र प्रदेशातील राजकारण आगामी काळात कोणत्या दिशेने जाणार, हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा वाय. एस. शर्मिला रेड्डी यांच्या मुलाच्या साखरपुडा सोहळ्यात दिसून आले. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी आणि शर्मिला यांच्यातील नात्यात वाढलेला दुरावा आणि वाढते राजकीय शत्रूत्व सगळ्यांनी पाहिले. दोघांनीही एकमेकांकडे पाहणेही जाणिवपूर्वक टाळल्याने चर्चांना उधाण आलं आहे. 

शर्मिला (YS Sharmila) यांचा मुलगा वाय. एस. राजा रेड्डी यांचा साखरपुडा गुरुवारी तेलंगणात (Telangana) पार पडला. या सोहळ्यात मुख्यमंत्री सपत्नीक आले होते. भाच्याची आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीची भेट घेत त्यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आईची गळाभेट घेतली आणि इतर काही नातेवाईकांशी काही सेकंदच बोलले.

JaganMohan Vs Sharmila
CM Nitish Kumar : नितीशकुमार पुन्हा ‘एनडीए’त? अमित शाह यांच्या विधानानंतर घडामोडींना वेग

सोहळ्यात जगनमोहन (JaganMohan Reddy) यांनी आपली बहीण शर्मिला यांच्याकडे पाहणेही टाळल्याची चर्चा आहे. दोघे एकमेकांसमोर आले तेव्हा दोघांनीही जाणिवपूर्वक एकमेकांशी लांबच राहणे पसंत केल्याचे व्हिडीओमध्येही दिसले. शर्मिला यांनी राजकारणात पाऊल ठेवण्यापूर्वी दोघांच्या नात्यामध्ये असलेला गोडवा यावेळी दिसलाच नाही, अशी चर्चा सोशल मीडियात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शर्मिला यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांना आंध्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत जगनमोहन आणि शर्मिला यांच्यात थेट लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर साखरपुडा झाल्याने या सोहळ्यात त्याचे पडसाद उमटल्याचे दिसले.

दरम्यान, काँग्रेसमधून बाहेर पडत स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यानंतर जगनमोहन यांच्यासाठी शर्मिला यांनी राज्यभर यात्रा काढली होती. पण राज्यात सत्तेत आल्यानंतर दोघा भावा-बहिणींत दुरावा वाढत गेला. पक्षात शर्मिला यांना कोणतंही पद मिळालं नाही. तसेच कौटुंबिक कारणांमुळेही शर्मिला यांनी थेट तेलंगणात राजकीय पक्ष स्थापन केला. पण काही महिन्यांत त्यांनी काँग्रेसमध्ये येऊन भावासमोर आव्हान उभे कले. त्यामुळे दोघांमधील राजकीय शत्रूत्व वाढल्याचे राजकीय विश्लेषकांकडून सांगितले जात आहे.

R...

JaganMohan Vs Sharmila
Lok Sabha Elections 2024 : सपा-रालोदचं ठरलं; किती जागा लढवणार? आकडाच सांगितला...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com