कुख्यात ड्रग पेडलरकडूनही अनिल देशमुखांची वसूली? भेटीचे फोटो व्हायरल

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा माणूस आणि एनसीबीच्या रडाडवरील ड्रग पेडलर चिंकू पठाण
chiku Pathan
chiku PathanSarkarnama

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. १०० कोटींच्या कथित वसूली आणि मनी लॉंड्रिंग प्रकरणात त्यांना २ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. याच आरोपांमुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा ही द्यावा लागला होता. दरम्यान आता अनिल देशमुख आणखी एका नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा (dawood ibrahim) माणूस आणि एनसीबीच्या रडाडवरील ड्रग पेडलर चिंकू पठाण याच्या सोबतच्या भेटीचे देशमुख यांचे फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. भाजप नेते मोहित कंबोज (Mohit kamboj) यांनी हे फोटो सार्वजनिक केले आहेत.

मोहित कंबोज यांनी आज पत्रकार परिषद घेवून राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, एका पक्षाने या प्रकरणात देशभरात चुकीचा नॅरेटिव्ह सेट केला. त्या गाजलेल्या फोटोत आर्यन खानसह किरण गोसावी दिसत आहे. त्यानंतर गोसावी भाजपशी संबंधित असल्याचेही सांगण्यात आले, तो कसा आर्यन खानला ओढत एनसीबीच्या कार्यालयात घेवून आला, हे दाखवण्यात आले. पण या सगळ्या प्रकरणामागचा मास्टरमाईंड सुनील पाटील आहे, असा दावाही कंबोज यांनी केला. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ मोहीत कंबोज यांनी सुनील पाटील आणि सॅम डिसूजा यांच्यात झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉटही शेअर केले.

chiku Pathan
आर्यन खान प्रकरणात रहस्यमय 'सुनिल पाटील'ची एन्ट्री, मास्टरमाईंडही तोच?

याचवेळी कंबोज यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही गंभीर आरोप केले. कंबोज म्हणाले, जानेवारी २०२१ मध्ये एनसीबीने दाऊद इब्राहिमचा खास माणूस आणि एमडी ड्रग्जचा सर्वात मोठा पेडलर असलेल्या चिंकू पठाणला अटक केली होती. त्याच्याजवळ त्यावेळी शस्त्र, पैसेही मिळून आले. सगळ्या राष्ट्रीय वाहिन्यांनी याबाबतच्या बातम्या दिल्या होत्या. पण महाराष्ट्राचे तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यावेळी महाराष्ट्राचे मंदिर मानल्या जाणाऱ्या सह्याद्री अतिथीगृहात चिंकू पठाणची भेट घेतली होती. त्यावेळी त्याठिकाणी ड्रग्ज माफियांना महाराष्ट्रात संरक्षण देण्यासाठी किती पैसे घ्यायचे याची बोलणी सुरु होती.

chiku Pathan
ही फक्त सुरुवात आहे...आर्यन खान प्रकरणाचा तपास वानखेडेंकडून काढल्यानंतर मलिकांचे सूचक ट्विट

कंबोज म्हणाले की हा फोटो ज्याने काढला त्याच्या दाव्यानुसार त्या भेटी दरम्यान त्या ठिकाणी एका मंत्र्यांचा जावई उपस्थित होता, त्यानेच ही भेट घडवून आणली. सुनिल पाटील ही तिथे उपस्थित होता असा आरोपही कंबोज यांनी केला. सोबतच तो जावई कोणाचा आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com