Arunachal Pradesh Assembly Election : लोकसभेच्या निकालाआधी ‘राष्ट्रवादी’ने उधळला गुलाल; भाजपचा ऐतिहासिक विजय

Assembly Election 2024 Arunachal Pradesh BJP in Power NCP Win : भाजपने मागील निवडणुकीत मिळालेल्या जागांचा रेकॉर्ड मोडला असून पेमा खांडू पुन्हा मुख्यमंत्री बनणार आहेत.
Ajit Pawar Pema Khandu
Ajit Pawar Pema KhanduSarkarnama

NCP Victory : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँगेसला केवळ एकच जागा मिळेल, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. पण प्रत्यक्ष निकाल लागण्याआधी राष्ट्रवादीने विजयाचा गुलाल उधळला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये पक्षाचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांसाठी महाराष्ट्राबाहेरील हा पहिला मोठा विजय ठरला आहे. अरुणाचलमध्ये राष्ट्रवादीने 15 मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. त्यापैकी टोको तातूंग, लिखा सोनी आणि निख कमिन हे उमेदवार विजयी झाले आहेत. पक्षाला 10 टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत.

भाजपचा धमाका

अरुणाचल प्रदेशातील 60 जागांचे निकाल रविवारी जाहीर झाले असून भाजपने 46 जागांवर विजय मिळवत इतिहास घडवला आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढण्यात आली. पण मतदानाआधीच त्यांचे दहा उमेदवारी विजयी झाले होते.

राज्यात केवळ 50 जागांवर मतदान झाले. त्यातही भाजपने 30 जागांवर विजय मिळवला आहे. मागील निवडणुकीत भाजपला 41 जागा होत्या. नॅशनल पीपल्स पार्टीला केवळ पाच तर काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागेल. या निवडणुकीत काँग्रेसच्या तीन जागा कमी झाल्या आहेत. पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल या पक्षाला दोन तर अपक्षांना तीन जागा मिळाल्या. 

विधानसभेतील एकूण संख्या - 60

भाजप - 46

नॅशनल पीपल्स पार्टी - 5

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - 3

पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल - 2

काँग्रेस - 1

अपक्ष -3

Ajit Pawar Pema Khandu
Bjp President News : लोकसभेच्या निकालानंतर भाजपमध्ये मोठे फेरबदल; राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील 'या' नेत्यांसह 'ही' नावे चर्चेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com