.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
New Delhi News, 15 Jan : दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर खटला भरण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने ईडीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे ऐन दिल्ली निवडणुकीपूर्वी केजरीवालांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
अरविंद केजरीवाल यांच्यावरील आरोपनिश्चिती होण्यापूर्वी पूर्व परवानगी आवश्यक होती ती केंद्रीय गृहमंत्रालयाने ईडीला दिली आहे. तर दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या या परवानगीमुळे केजरीवाल अडचणीत येण्याची शक्यता आहे.
मात्र, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केजरीवालांना अडकण्यासाठी भाजपकडून (BJP) हे षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप केला जात आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ED ला खटला चालवण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्रालयाची पूर्व परवानगी घेणे गरजेचे असेल असे नमुद केले होते. त्यानुसार आता गृहमंत्रालयाने ही परवानगी ईडीला दिली आहे. तर या मुद्द्यावरून आता देशातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात दिल्लीचे (Delhi) तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च 2024 रोजी अटक केली होती आणि मे महिन्यात त्यांच्या, पक्ष आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मद्य धोरण घोटाळा प्रकरणातील शेवटच्या आरोपपत्रात ईडीने केजरीवाल आणि सिसोदिया हे या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचं म्हटलं होतं.
मात्र, सरकारी पदावर असलेल्या व्यक्तीविरूद्ध मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यातर्गंत (PMLA) खटला नोंदवण्यासाठी संबंधित प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होते. त्यासाठी केजरीवाल यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी ईडीने दिल्लीच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून परवानगी मागितली होती. त्यानुसार आता हा खटला चालवण्याची परवानगी ईडीला देण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.