
New Delhi News : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं 7 जानेवारीला जाहीर केला आहे. येत्या 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 8 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपनं (BJP) ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीसाठी 40 स्टारप्रचारकांची यादीही जाहीर करण्यात उमेदवार याद्याही जाहीर होत आहेत.
दिल्लीतील निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पार्टी (AAP) तर दुसरीकडे केंद्रातील सत्ताधारी भाजप व काँग्रेस अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपने दिल्ली विधानसभेसाठी बुधवारी (ता.15) जाहीर स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली.
या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा,संरक्षणमंत्री राजनाथ सिंह,शिवराज सिंह चौहान,मनोहरलाल खट्टर,धर्मेंद्र प्रधान,गिरीराज सिंह तर महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मंत्री नितीन गडकरी,मंत्री पीयूष गोयल यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीत यंदा विजय मिळवून दिल्लीची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपकडून पूर्ण ताकद पणाला लावली आहे. यासाठी दिग्गज नेत्यांची फौज दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आप आणि काँग्रेसविरुद्ध मैदानात उतरवली आहे. देशभरातल्या भाजपशासित 7 राज्यांचे मुख्यमंत्री आणि जवळपास डझनभर केंद्रीय मंत्र्यांचा या स्टार प्रचारकांच्या यादीत असणार आहे.
भाजप आम आदमी पार्टीकडे दहा वर्षांतील कामांचा हिशोब मागत आहे. तर काँग्रेस दिल्लीची सत्ता पुन्हा एकदा काबिज करण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहे. शीला दिक्षीत यांच्या कार्यकाळात दिल्ली कशी होती आणि आता आम आदमी पार्टीच्या काळात दिल्लीची काय अवस्था झाली आहे, याबाबत काँग्रेसकडून जनतेला सांगितलं जात आहे.
दिल्लीत निवडणुक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन ते चार प्रचार रॅली काढणार आहे.त्यात एक रॅली उत्तर पश्चिम दिल्ली, दुसरी रॅली उत्तर पूर्व दिल्ली आणि तिसरी रॅली दक्षिण किंवा दक्षिण पश्चिम दिल्लीत होईल.पंतप्रधान मोदींशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) दिल्लीत सात पेक्षा अधिक रॅली करू शकतात.
अमित शाह दिल्लीत चार ते पाच रोड शो देखील करू शकतात, अशी शक्यता आहे. त्यांच्या रोड शोची सुरूवात 17 जानेवारी होणार आहे. आतापर्यंत शाहांनी कोणतीही प्रचारसभा किंवा बैठक घेतलेली नाही. पण त्यांच्याकडून दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टी व अरविंद केजरीवाल यांच्या पक्षावर नेहमीच टीका केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.