AAP Income : केजरीवालांच्या 'आप'च्या उत्पन्नात मोठी घट; खर्च भागवताना उडणार तारांबळ?

Arvind Kejriwal Aam Aadmi Party Delhi Assembly elections decline income : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आम आदमी पक्षाच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचे समोर आले आहे.
AAP Politics
AAP PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : इस जनम मैं मोदी दिल्लीत 'आप'चा पराभव करू शकणार नाही, अशी वल्गना करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा चांगलाच धक्का बसला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'चा पराभव करत भाजप 27 वर्षांनंतर दिल्लीत सत्तेवर आली.

दिल्लीत पराभवाचा धक्का बसलेल्या 'आप' पक्षाला त्याच्या आर्थिक उत्पन्नात झालेलवी घट देखील धक्कादायक अशीच आहे. 'आप'च्या उत्पन्नात तब्बल 24 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. उत्पन्नाच्या घटामध्ये 'बसपा' आणि 'आप' एकाच रेषेत आले आहे.

भाजपने दिल्लीची (Delhi) सत्ता काबिज करताच, 'आप'ला धक्क्यावर धक्के देण्याची तयारी सुरू केली आहे. यमुना नदीच्या साफसफाईचा मुद्दा आपने पहिल्या निवडणुकीत चांगलचा पेटवला होता. यानंतर हा मुद्दा त्यांच्या जाहिरनाम्यात कायम होता. पण प्रत्यक्षात यावर कोणतेही काम झाले नाही. हाच भावनात्मक मुद्दा भाजपने घेत, यमुना नदीची साफसफाई सुरू केली आहे.

AAP Politics
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 : आग्राच्या किल्ल्यात ‘अफझल खान वधाचा’ प्रसंग रंगणार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती

भाजपने (AAP) देशात हिंदुत्वाच्या मुद्यावर एक-एक राज्य जिंकत चालली आहे. याच भाजपच्या उत्पन्नात 2023-24 मध्ये 83.85 टक्क्यांची म्हणजे, 1 हजार 979 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. काँग्रेसच्या उत्पन्नातही 452 कोटी रुपयांवरून 1 हजार 225 कोटी रुपयांपर्यंत म्हणजेच 171 टक्के इतकी वाढ झाली आहे.

AAP Politics
BJP Politics : भाजपचं अजब पाॅलिटिक्स, दिल्लीचा सीएम कोण? नाव निश्चित नाही, तरी मंत्रिमंडळाच्या शपथविधीची तयारी

या दोन्ही पक्षाच्या तुलनेत राष्ट्रीय पातळीवर विस्ताराच्या तयारी असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आपच्या उत्पन्नात तब्बल 24 टक्के घट झाली आहे. त्या खालोखाल बसपाच्या 23 टक्के घट झाली आहे. पक्षाच्या उत्पन्नात घट होत असतानाच, आपचा प्रचारावर 19, तर बसपाचा 23 कोटी रुपये खर्च निवडणुकीवर झाला आहे.

पक्षांना उत्पन्न कोठून मिळाले

भाजपला स्वच्छेने 3 हजार 967 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. काँग्रेसला अनुदान आणि देणग्या स्वरूपात 1 हजार 129 कोटी रुपये मिळाले आहे. माकपला देणगी आणि अनुदान स्वरुपात 74 कोटी मिळाले आहेत. बसपाला शुल्क आणि सदस्यत्वातून 26 कोटी रुपये मिळाले आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाला अनुदानातून 22 कोटी रुपये मिळाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com