Arvind Kejriwal Arrested : केजरीवालांचं मुख्यमंत्री पद जाणार? जनहित याचिका दाखल...

Delhi Political News : "केजरीवाल यांनी मद्य धोरणात गुन्हेगारी कृत्यांचा अवलंब केला आहे."
Arvind Kejriwal Arrested
Arvind Kejriwal Arrested Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक झालेले दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. ईडीने केजरीवाल यांना अटक केल्यानंतर आता केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका (PLI) दाखल करण्यात आली आहे. दिल्लीचे रहिवासी सुरजित सिंह यादव यांनी दिल्ली उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी केजरीवाल यांच्या अटकेनंतर राजीनामा देणार नसून केजरीवाल हे तुरुंगातूनच सरकार चालवणार असल्याचे स्पष्ट केले होते. (Latest Marathi News)

दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, "मुख्यमंत्र्यांवर आर्थिक घोटाळ्याचा आरोप असल्याने त्यांच्यावरील आरोपांची शहानिशा होईपर्यंत त्यांना मुख्यमंत्री पदावर राहण्याची परवानगी देण्यात येऊ नये. मी शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ता आहे, असे जनहित याचिका दाखल करणारे सुरजित यादव यांनी आपली माहिती सांगितली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जनहित याचिकामध्ये सुरजित यांनी असेही म्हटले आहे की, केजरीवाल मुख्यमंत्री पदावर राहिल्याने कायद्याच्या प्रक्रियेत अडथळा येईल. त्यामुळे राज्यातील घटनात्मक व्यवस्था मोडीत निघण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांना सार्वजनिक पदावर राहण्याची अनुमती देण्यात येऊ नये.

Arvind Kejriwal Arrested
Arvind Kejriwal News : केजरीवाल हेच किंगपिन; 45 कोटी हवालामार्फत गोव्यात पाठवले, ईडीचा मोठा दावा

ईडीने (ED Action) काल (दि. 21 मार्च) रात्री अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या निवासस्थानातून अटक केली होती. मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, बीआरएस नेत्या के कविता यांच्यासह अनेक बडे नेते आधीच तुरुंगात आहेत.

Arvind Kejriwal Arrested
BJP News: "शरद पवार आणि राहुल गांधींच्या नादाला लागून..." राऊतांच्या मोदींवरील टीकेला भाजपचं सडेतोड प्रत्युत्तर

केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अटकेनंतर, ईडीने त्यांना आज शुक्रवारी राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर केले. या वेळी ईडीने न्यायालयाला सांगितले की, केजरीवाल हे मद्य धोरण घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या 10 दिवसांच्या कोठडीची मागणी करताना, एएसजी एस. व्ही. राजू यांनी न्यायालयाला सांगितले की, केजरीवाल यांनी मद्य धोरणात गुन्हेगारी कृत्यांचा अवलंब केला आहे, असा आरोप ईडीने लावला आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com