
AAP News: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दमदार कामगिरीमुळे अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'ला सत्ता गमवावी लागली होती.या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे संयोजक खुद्द अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले होते.हा केजरीवाल यांच्यासह 'आप'साठीही मोठा राजकीय धक्का होता. यानंतर केजरीवाल राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा होती. पण आता त्यांनी मोठा निर्णय घेत त्यांच्याऐवजी तब्बल 10 हजार कोटींची संपत्ती असणारे उद्योगपती राजेंद्र गुप्ता यांना रविवारी(ता.5) राज्यसभेचे तिकीट दिलं आहे. त्यांच्या या खेळीमागं केजरीवालांची मोठी रणनीती असल्याची चर्चा आहे.
आपच्या अरविंद केजरीवाल यांनी खासदारकीची संधी सोडतानाच धक्कातंत्र वापरत पंजाबमधील सर्वात श्रीमंत उद्योगपती राजेंद्र गुप्ता यांना राज्यसभेचे तिकीट दिले आहे.गुप्ता हे प्रसिध्द व उद्योग विश्वात मोठं नाव असलेल्या ट्रायडंट ग्रुपचे संस्थापक आहे.ते आता 'आप'च्या तिकीटावर राज्यसभेत खासदार होणार आहेत. आम आदमी पक्षाकडून आगामी पोटनिवडणुकीसाठी उद्योगपती राजेंद्र गुप्ता यांना उमेदवारी घोषित केली आहे.
आपनं अचानक 10,000 कोटींची संपत्ती असलेल्या उद्योगपती राजेंद्र गुप्ता यांना राज्यसभेचं तिकीट देताना एकाच दगडात अनेक पक्षी मारले असल्याचे बोलले जात आहे. गुप्ता यांना उमेदवारी देण्यामागं नेमकी काय आहेत कारणं,याविषयी माहिती घेऊयात.
1) दिल्लीतील सत्ता गमावल्यानंतर केंद्रातील मोदी-शहा या भाजपच्या जोडगोळीनं आपला मोर्चा पंजाबकडे वळविला आहे.
2)पंजाबच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी भाजपनं पु्न्हा प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या (BJP) वाढत्या प्रभावासमोर केजरीवालांना खासदार म्हणून राज्यसभेवर जाणं निश्चितच परवडणारे नव्हते.
3) केजरीवाल यांचे दिल्लीतील पराभवानंतर पंजाबचे दौरे वाढले आहेत.राज्य सरकारच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन,जाहीर सभा,रोड शो यांमध्ये ते पंजाबच्या राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत.
4) पंजाबमधील विधानसभा निवडणूक होण्यास अद्याप दोन वर्षांचा कालावधी आहे.त्यामुळे आतापासूनच तेथील संघटना मजबूत करणे व भाजप-काँग्रेसला जोरदार लढत देण्याचा केजरीवाल यांचा मानस आहे.
5) आजपर्यंतची गुप्ता यांची ओळख जरी एक उद्योगपती म्हणून असली तरी त्यांची पक्ष भेदाभेद दूर सारत प्रत्येक सरकारशी जुळवून घेण्यात हातखंडा आहे. आपकडून राजेंद्र गुप्ता यांनी दिलेली राज्यसभेची उमेदवारी हा एक धोरणात्मक निर्णय मानला जात आहे.यामागं प्रादेशिक प्रतिनिधीला संधी दिल्यामुळे आपसूकच पक्षात महत्त्वाचा संदेश गेला आहे.
भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेले राजेंद्र गुप्ता यांच्याकडे विविध महत्त्वाच्या पदांवर काम करण्याचा दांडगा अनुभव आहे. ‘आप’ सरकारमध्ये त्यांनी पंजाब राज्य आर्थिक धोरण आणि नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.तसेच पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचीही त्यांनी धुरा सांभाळलेली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.