Arvind Kejriwal News : "इंडिया'आघाडीचे नाव बदलून भारत केले तर...": मुख्यमंत्री केजरीवालांचा सवाल

Opposition Parties Alliance : विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या निर्णयावर टीका केली आहे.
Arvind Kejriwal News
Arvind Kejriwal NewsSarkarnama

AAP News : देशात होणाऱ्या G-20 परिषदेत सहभागी होणाऱ्या परदेशी नेत्यांच्या अधिकृत निमंत्रणांमध्ये पारंपारिक 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' ऐवजी 'भारताचे राष्ट्रपती' वापरल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या निर्णयावर टीका केली आहे. विरोधी पक्षांनी आपल्या आघाडीला 'इंडिया' नाव दिले आहे, त्यामुळेच ते नाव बदल असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केला.

केजरीवाल यांनी आमंत्रणात वापरलेल्या शब्दांवर तीव्र प्रतिक्रिया दिली. केजरीवाल म्हणाले, विरोधी आघाडीने स्वतःला 'भारत' म्हणायचे ठरवले तर सत्ताधारी पक्ष देशाचे नाव बदलून 'भाजप' ठेवेल का ? असा सवाल केला. तसेच नावात बदल होत असल्याची कोणतीही अधिकृत माहिती माझ्याकडे नाही.

Arvind Kejriwal News
Pankaja Munde News : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची मोठी घोषणा, म्हणाल्या,'' २०२४ च्या विधानसभा निवडणुकीआधी...

देशातील 28 पक्षांनी आपल्या आघाडीचे नाव 'इंडिया' ठेवले आहे. त्यामुळे केंद्र सरकार (Central Government) भारताचे नाव बदलणार आहे का ? देश कोणा एका पक्षाचा नाही तर 140 कोटी जनतेचा आहे. आम्ही आघाडीचे नाव बदलून भारत ठेवले तर ते भारताचे नाव बदलून भाजप करतील का ? असा बोचरा सवाल केजरीवाल यांनी केला.

Arvind Kejriwal News
PCMC News : 'गुड न्यूज' : माजी उपमहापौर शैलजा मोरेंच्या प्रयत्नामुळे गणेश मंडळाचे मंडप भाडे झाले माफ

भाजप (BJP) विरोधी आघाडीवर इतका नाराज आहे की, जेव्हा पहिल्यांदा घोषणा केली गेली तेव्हा त्यांनी 'एक राष्ट्र, एक निवडणूक' या प्रस्तावाद्वारे लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला. केजरीवाल यांचे पक्षाचे सहकारी आणि राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनीही भाजपवर निशाणा साधत देश कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नाही, असे म्हटले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com