Pankaja Munde News : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची मोठी घोषणा, म्हणाल्या,'' २०२४ च्या विधानसभा निवडणुकीआधी...

Nashik Political News : '' मी कुठल्याही पदावर नसताना...''
Bjp Leader Pankaja Munde News
Bjp Leader Pankaja Munde News Sarkarnama
Published on
Updated on

Nashik : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची सोमवारपासून शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरू झाली आहे. मुंडे या यात्रेच्या माध्यमातून आठ दिवस राज्यातील काही जिल्हे पिंजून काढणार आहे. याचवेळी विविध धार्मिकस्थळे आणि शक्तिपीठांना भेट देणार असून तसेच जनतेशी संवादही साधणार आहेत. याच यात्रेदरम्यान, पंकजा मुंडे यांनी नाशिक येथे मोठं विधान केलं आहे. त्यांनी 2024 विधानसभा निवडणुकीआधी यात्रा काढणार असल्याचे जाहीर केले आहे.

माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मराठा आराक्षणासह सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. मुंडे म्हणाल्या, शिवा आणि शक्तिने मला लोकांचे दर्शन घे असं सुचवले आहे, म्हणून आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे आले आह्रे. मात्र, माझा इथ अनोखा सन्मान केला. मी कुठल्याही पदावर नसताना माझे मोठे स्वागत झाले. जेसीबीने फुले उधळली. माझी यात्रा सफल झाली असेही त्या म्हणाल्या.

Bjp Leader Pankaja Munde News
PMC News : नितेश राणेंकडून आयुक्त विक्रम कुमार, प्रशांत वाघमारेंचा एकेरी उल्लेख, २४ तासातच अधिकाऱ्याचंही रोखठोक प्रत्युत्तर

'' तुमची मान खाली जाईल असे काही...''

तुम्हाला द्यायला माझ्याकडे काहीही नाही. हे शक्तिप्रदर्शन नाही, असे प्रदर्शन करायला खूप मोठे ठेकेदार हाताला लागतात. तुमची मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी ही शिव शक्ती परिक्रमा आहे. मला कुठल्याही गोष्टीचा मोह नाही. मुंडेसाहेब नावाचा वृक्ष तयार झाला, त्या सावलीखाली मला जगायचे आहे. दोन महिने मी माझ्याकडे लक्ष दिले, माझी काही कामे करून घेतली. आपल्या देशात जाती धर्मावर वाद सुरू आहेत. पण, मी माझ्या लोकात शांतपणे जगत आहे. तुमची मान खाली जाईल असे काही करणार नाही असा विश्वासही पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला. (Latest Marathi News)

बच्चू कडूंचं खळबळजनक विधान...

प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू(Bachchu Kadu) यांनी खळबळजनक विधान केलं आहे. युतीत सन्मान मिळाला नाही तर पंकजा मुंडे यांच्यासोबत युती करण्यास तयार असल्याचे कडू म्हणाले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. निवडणुकीत सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर स्वतंत्रपणे लढण्याचाही इशाराही कडू यांनी यापूर्वी दिला आहे. आता त्यांनी थेट मुंडे यांच्यासोबत जाण्याचे वक्तव्य केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

Bjp Leader Pankaja Munde News
Deepak Kesarkar News : शिक्षक दिनाच्या दिवशीच शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन ; ठाकरे गटाने केली 'ही' मागणी

बच्चू कडू म्हणाले, पंकजा मुंडेंमध्ये क्षमता आहेत, यात मला काही शंका नाही. त्यांनीही आपल्या क्षमता तपासून पाहव्यात. त्यांनी मनावर घेतले, तर त्या करूही शकतात. स्वतःचे दहा पंधरा आमदार असतील, तर मग आम्हीही पंकजा मुंडे यांच्यासोबत युती करू असंही ते म्हणाले.

युती करताना लोक जमा केली, पण लोकांचे कामेही करावे लागतात. या पाच वर्षात जे पक्षांतर झाले, ते मागच्या पन्नास वर्षात झालं नाही असा चिमटाही बच्चू कडूंनी राज्यकर्त्यांना काढला.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com