Mumbai Election Voting Updates : मतदान न करणाऱ्यांचा टॅक्स वाढवा! परेश रावल यांनी सुचवली शिक्षा

Paresh Rawal News : परेश रावल हे भाजपचे माजी खासदार आहेत. मात्र, सध्या ते राजकारणात सक्रीय नाहीत. सोमवारी त्यांनी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला.
Paresh Rawal
Paresh RawalSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानात महाराष्ट्रात निरुत्साह दिसून येत आहे. पहिल्या चार टप्प्यांतही हीच स्थिती होती. पाचव्या टप्प्यात मुंबईतील सर्व मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरू आहे. मात्र, मतदानाची टक्केवारी अत्यल्प असल्याने अनेकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. (Mumbai Election Voting Updates) भाजपचे माजी खासदार आणि ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनीही यावर नाराजी व्यक्त करताना मतदान न करणाऱ्या मतदारांसाठी शिक्षा सुचवली आहे.

परेश रावल (Paresh Rawal) यांनी सोमवारी सकाळी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी मीडियाशी बोलताना मतदान (Voting) प्रक्रियेत सहभागी होण्याचे महत्व सांगत लोकांना मतदान करण्याचे आवाहनही केले. सरकारने हे केले नाही, ते केले नाही, असे तुम्ही म्हणाल. पण आज जर तुम्ही मतदान केले नाही तर याला तुम्ही जबाबदार असाल, सरकार नाही, असे रावल म्हणाले. (Latest Political News)

Paresh Rawal
Lok Sabha Election Voting Updates : सहा तासानंतर महाराष्ट्रात निरुत्साह; 30 टक्केही मतदान नाही

नागरिकांनी त्यांचे कर्तव्य पार पाडावे, यावर रावल यांनी जोर दिला. तसेच मतदान न करणाऱ्या मतदारांना त्यांनी शिक्षाही सुचवली. जे मतदान करत नाहीत, त्यांनी शिक्षेची काहीतरी तरतुद हवी. टॅक्समध्ये वाढ करणे किंवा इतर काही शिक्षा असायला हवी, असे रावल यांनी सांगितले. मुंबईतील सहा मतदारसंघात सोमवारी मतदान होत आहे. (Lok Sabha Election 2024)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरू असून दुपारी एक वाजेपर्यंत 36.73 टक्के मतदान झाले आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रातील (Maharashtra) मतदान देशपातळीवर सरासरी मतदानापेक्षा कमी असल्याचे चित्र आहे. पाचव्या टप्प्यांत दुपारी एक वाजेपर्यंत महाराष्ट्रात 27.78 टक्के मतदान झाले आहे. देशात महाराष्ट्र तळाला राहिले आहे. तर लडाख या केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक 52.02 टक्के मतदान झाले आहे. त्याखालोखाल पश्चिम बंगालमधील टक्केवारी 48.4 एवढी आहे. मागील चार टप्प्यांतही बंगालमधील टक्केवारी अधिक होती. (Latest Marathi News)

पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील 13, उत्तर प्रदेशातील 14, बंगालमधील सात, बिहार आणि ओडिशातील प्रत्येकी पाच, झारखंडमध्ये तीन तर लडाख व जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी एका मतदारसंघात मतदान होत आहे. देशात पाचव्या टप्प्यात अनेक हायप्रोफाईल लढती होत आहेत. रायबरेलीत राहुल गांधी (Rahul Gandhi), अमेठीत स्मृती इराणी, लखनौमध्ये राजनाथ सिंह यासंह पियुष गोयल, श्रीकांत शिंदे, चिराग पासवान, भारती पवार, कपिल पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Paresh Rawal
Maharashtra Political News : गुप्त समझोता कळला अन् शिंदे-पवार बाहेर पडले! राष्ट्रवादीच्या नेत्यानं गुपित फोडलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com