Arvind Kejriwal News : दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक होणार? आज होणार ED चौकशी

Arvind Kejriwal ED Case Investigation : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आज ईडीकडून चौकशी करण्यात येणार असल्याने दिल्लीतलं वातावरण तापलं आहे.
Arvind Kejriwal News
Arvind Kejriwal NewsSarkarnama
Published on
Updated on

Delhi CM Arvind Kejriwal ED Case : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आज होणार ED चौकशी होणार आहे. कथित मद्य धोरण परवाना वाटप घोटाळ्याप्रकरणी चौकशी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

कथित मद्य धोरण परवाना वाटप घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने ३० ऑक्टोबरला समन्स बजावले होते. याच प्रकरणी यापूर्वी केजरीवाल यांची CBI ने नऊ तास चौकशी केली होती. याआधी माजी उपमुखमंत्री मनीष सिसोदिया आणि खासदार संजय सिंह यांना यापूर्वीच ED ने अटक केली आहे

Arvind Kejriwal News
Arvind Kejariwal Big News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना मोठा धक्का; ईडीची नोटीस; काय आहे प्रकरण...?

भाजपच्या सांगण्यावरून नोटीस बजावली- केजरीवाल

या चौकशीला जाण्यापूर्वी केजरीवाल यांनी ईडीला उत्तर दिलं आहे. ही नोटीस बेकायदेशीर आणि राजकीय दबावातून देण्यात आली आहे. चार राज्यांमध्ये निवडणुकांच्या प्रचाराला जाण्यापासून रोखण्यासाठी भाजपच्या सांगण्यावरून ही नोटीस बजावली गेली आहे, असा आरोप करत ही नोटीत मागे घेण्याची मागणी केजरीवाल यांनी केली आहे.

केजरीवाल यांना अटक होणार?

केजरीवाल यांना भाजप सरकार अटक करणार असल्याचा दावा 'आप' च्या मंत्री अतिशी यांनी केला आहे. यांनतर INDIA आघाडीतील इतर नेत्यांना अटक करणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय. केजरीवाल यांच्यानंतर पुढचा नंबर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन, तामिळनाडू मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आहे, असा दावा आतिशी यांनी केला.

शरद पवार, उद्धव ठाकरेंनाही अटक होणार?

दरम्यान, 'आप'चे खासदार राघव चड्ढा यांनीही अतिशी यांच्यासारखाच मोठा दावा केला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही अटक केली जाईल, असं राघव चड्ढा यांनी म्हटलं आहे.

Arvind Kejriwal News
Maratha Reservation : सोलापूरचे मराठे दिल्लीला धडकले; घोषणांनी जंतर-मंतर दणाणलं!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com