Arvind Kejriwal News : लोकसभेपूर्वी केजरीवालांना मोठा दिलास, न्यायालयाकडून 'या' प्रकरणात जामीन मंजूर

Arvind Kejriwal : मनीष सिसोदिया, संजय सिंह यांच्यानंतर अरविंद केजरीवाल ईडीच्या निशाण्यावर आहेत.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांना न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांना ईडीने वारंवार समन्स पाठवूनदेखील ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले नव्हते. त्यामुळे ईडीनं न्यायालयात केजरीवालांविरोधात याचिका दाखल केली होती.

Arvind Kejriwal
Lok Sabha Election 2024 : पुतण्याला झुकते माप देताच काका भाजपवर खवळले; ‘एनडीए’ची डोकेदुखी वाढली

या प्रकरणी राऊज अॅव्हेन्यू न्यायालयात आज ( शनिवारी 16 मार्च ) सुनावणी पार पडली. या वेळी न्यायालयानं 15 हजारांच्या जातमुचकल्यावर केजरीवालांना ( Arvind Kejriwal ) नियमित जामीन मंजूर केला आहे. काही दिवसांपूर्वी केजरीवालांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवालांना ईडीनं चौकशीसाठी 8 वेळा समन्स बजावलं होतं. पण, ते एकदाही चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाले नव्हते. यानंतर ईडीनं केजरीवालांच्या विरोधात न्यायालयात दोन तक्रारी दाखल केल्या होत्या. त्याच प्रकरणात न्यायालयानं त्यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावलं होतं. त्यानुसार केजरीवाल न्यायालयात हजर राहिले होते. तसेच, जामीन मंजूर केल्यानंतर त्यांना न्यायालयातून बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली.

Arvind Kejriwal
Electoral Bond Update : तपास यंत्रणांच्या कारवायांनंतर 'या' कंपन्यांनी दिल्या राजकीय पक्षांना भरभरून देणग्या!

प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, केजरीवाल यांनी पीएमएलए अंतर्गत मिळालेल्या नोटिशीकडे वारंवार दुर्लक्ष केल्यास त्यांना अटक होऊ शकते. तसेच, केजरीवाल हजर न झाल्यास तपास अधिकारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी करू शकतात. ठोस पुरावे मिळाल्यास किंवा प्रश्नांनी समाधानकारक उत्तरे न दिल्यास त्यांना अटक केली जाऊ शकते.

R

Arvind Kejriwal
Lok Sabha Election 2024 : राम गोपाल वर्मांची राजकारणात एंट्री; दक्षिणेतील सुपरस्टारला भिडणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com