Lok Sabha Election 2024 : राम गोपाल वर्मांची राजकारणात एंट्री; दक्षिणेतील सुपरस्टारला भिडणार

Ram Gopal Varma News : राम गोपाल वर्मा यांनी अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. आता त्यांनी अचानक राजकारणात एंट्री घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Ram Gopal Varma, Pawan Kalyan
Ram Gopal Varma, Pawan KalyanSarkarnama

Andhra Pradesh News : आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) बॉलिवूड विरुद्ध टॉलिवूड असा सामना पाहायला मिळणार आहे. सत्या, सरकार, रंगीला अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी राजकारणात एंट्री केली आहे. आज त्यांनी आपली उमेदवारीही जाहीर केली. ते दक्षिणेतील सुपरस्टारला निवडणुकीच्या रिंगणात भिडणार आहेत.

राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) पीठापुरम मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे आज दुपारी जाहीर केले. त्यांनी एक्स हँडलवरून या निर्णयाची माहिती दिली. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. कारण आज सकाळीच दक्षिणेतील सुपरस्टार पवन कल्याण (Pawan Kalyan) यांनी याच मतदारसंघातून निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.

Ram Gopal Varma, Pawan Kalyan
Election Commissioner News : काँग्रेस नेत्यानं फोडली नव्या निवडणूक आयुक्तांची नावं...

पवन कल्याण हे जनसेवा पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी भाजप (BJP) आणि तेलगू देसम पक्षाशी आघाडी केली आहे. या आघाडीचे ते पीठापुरम मतदारसंघाचे उमेदवार असतील. त्यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर काही वेळातच वर्मांनीही आपली उमेदवारी जाहीर करून टाकली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वर्मा यांनी कोणत्या पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढणार की अपक्ष उमेदवार असणार, याबाबत अद्याप खुलासा केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत उत्सुकता वाढली आहे. ते काँग्रेसच्या (Congress) तिकिटावर लढण्याची शक्यता आहे. वर्मा यांना 1990 मधील शिवा चित्रपटाने ओळख मिळवून दिली. त्यानंतर सत्या, कंपनी, सरकार, रंगीला, भूत यांसह अनेक चित्रपटांचे कौतुक झाले.

दरम्यान, आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना त्यांची बहीण वाय. एस. शर्मिला यांनी आव्हान उभे केल्याचे मानले जात आहे. त्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष असून, लोकसभेत अधिकाधिक जागा निवडून आणण्यासाठी प्रय़त्नशील आहेत. त्यासाठी प्रसिद्ध चेहऱ्यांना त्या मैदानात उतरवू शकतात, अशी चर्चा आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारांचा फायदा थेट एनडीएच्या उमेदवारांना होऊ शकतो, अशीही चर्चा आहे.

R

Ram Gopal Varma, Pawan Kalyan
Lok Sabha Election 2024 : बिहारमध्ये भाजपनं डाव साधला; नितीश कुमारांना टाकलं मागे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com