Delhi News : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या नूतनीकरणात कथित घोटाळ्याच्या प्रकरणी सीबीआय चौकशी करणार आहे. कोरोना काळात या नूतनीकरणावर 171 कोटी खर्च झाल्याचा भाजपचा (BJP) आरोप आहे. केजरीवालांच्या या नूतन शासकीय निवासस्थानाला भाजप नेत्यांकडून 'शीशमहल' असे संबोधण्यात येते.
आधीच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया मद्य परवाना घोटाळा प्रकरणी जेलमध्ये आहेत. आता थेट केजरीवला यांच्यावर आरोप झाले आहेत. तसेच या प्रकरणात सीबीआय सरसावली आहे. सीबीआयने (CBI) या संबंधित गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीच्या नायब राज्यपालांनी या प्रकरणातील सर्व रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या होत्या. या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते.
दिल्लीच्या उपराज्यपालांनीच मे महिन्यात याबाबत सीबीआयकडे चौकशीची विनंती करत पत्र लिहिले होते. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर प्रकरणाची फाईल दिल्ली सरकारकडून मागवण्यात आल्याची माहिती आहे. या नुतणीकरण प्रकरणी आधीही आरोप करण्यात आले होते. याची चौकशीही झाली होती. चौकशीत सर्व आरोप हे खोटे असल्याचे सिद्ध झाले होते. त्यामुळे या चौकशीनंतरही भ्रष्टाचाराचे हे आरोप खोटे असल्याचे सिद्ध होईल, असे आम आदमी पक्षाने म्हटले आहे.
केजरीवाल यांचे 6 फ्लॅग रोडवर निवासस्थान आहे. कोरोना काळात या निवासस्थानाचे नूतनीकरण करण्यात आल्याचा आणि त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. या कामासाठी अनेक नियमांना बगल देण्यात आल्याचा आरोपही विरोधी पक्षांनी केला आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.