Revenue Dept On Stamp Paper : महसूल विभागाचा मोठा निर्णय; आता शंभर, पाचशेच्या स्टॅम्पऐवजी 'फ्रँकिंग मशीन'

Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांना टोले
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News : जमीन किंवा फ्लॅटच्या खरेदी विक्रीसाठी सध्या वापरात येणारे शंभर आणि पाचशे रुपयांचे स्टॅम्प बंद करण्यात येणार आहे. या स्टॅम्पऐवजी फ्रँकिंग मशिनचा वापर करण्याचा विचार राज्य सरकारने सुरू केला आहे. त्यादृष्टीने सरकार पावले उचलत आहे. याबाबत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिली. त्यामुळे भविष्यात शंभर आणि पाचशे रुपयांचे स्टॅम्प बंद होऊन फ्रँकिंग मशीनचाच वापर होईल, असेही त्यांनी सांगितले.

नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विखे पाटलांनी बँक स्तरावर किंवा स्टॅम्प वेंडर यांच्याकडेच फ्रँकिंग मशिन कसे उपलब्ध करून देता येतील, याचा सध्या आढावा घेण्यात येत असल्याची माहिती दिली.

Radhakrishna Vikhe Patil
Mohit Kamboj On Ajit Pawar : आधी डिवचलं मग सावरलं; अजितदादांना मोहित कंबोज यांनी काय म्हटलं?

धनगर व मराठा आरक्षणाला कायद्याच्या चौकटीत बसवण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न असल्याचे विखेंनी सांगितले. ते म्हणाले, 'राज्य सरकारला दिलेली दिलेल्या मुदतीपर्यंत समाजाने वाट बघावी. या कालावधीत सरकारने काही पावले न उचलल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबावा. शेवटी आंदोलने करण्याचा अधिकार सर्वांना आहे, परंतु राज्य सरकारची भूमिकाही जनतेने लक्षात घेतली पाहिजे,' असे आवाहनही त्यांनी धनगर आणि मराठा समाजाला केले आहे.

जीएसटी चुकवल्याप्रकरणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना नोटीस बजावलेली आहे. यावर मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, 'ही राजकीय सूटबुद्धीने कारवाई केलेली नाही. केंद्रीय तपास यंत्रणा हे त्यांच्या पद्धतीने काम करतात. त्यामुळे या कारवाईमध्ये कुठलाही राजकीय हेतू नाही,' असे त्यांनी स्पष्ट केले.

'ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांना फक्त आता आरोप करण्याचे काम उरले आहे. ते काही शासनाचे गोडवे जाणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या आरोपांकडे आम्ही फारसे लक्ष देत नाही,' अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली.

Radhakrishna Vikhe Patil
Ghodganga Sugar Factory : घोडगंगा साखर कारखाना यंदा सुरू होणार का? शिवाजीराव काळेंच्या शंकांचे कारण काय?

शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला

जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत लिलाव बंद ठेवल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत झालेली बैठक निष्पळ ठरली. या व्यापाऱ्यांनी शरद पवारांची भेट घेण्याचे ठरवले होते. यावर, अनेक लोक सत्तेत राहिले, पण त्यांनाही हा प्रश्न सोडवता आला नाही. सत्तेत असताना त्यांनी कुठल्याही बाबतीत धोरण ठरवले नाही. हा प्रश्न फक्त कांद्याचाच नाही तर इतर पिकांचाही आहे, असे म्हणत विखे पाटलांनी नाव न घेता शरद पवारांना टोला लगावला.

Radhakrishna Vikhe Patil
Supriya Sule Baramati : बारामतीत राष्ट्रवादी-भाजप सक्रिय; इंदापुरात सुळे तर खडकवासल्यात अंकिता पाटील मैदानात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com