Arvind Kejriwal : दिल्ली गमावलेल्या 'केजरीवालांचे' पंजाबमध्ये जीवाचं रान : जिंकलं तर ठीक नाहीतर 'आप'ला कुलूपच!

AAP chief Arvind Kejriwal : दिल्ली विधानसभा निवडणूक गमावल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पंजाबवर जास्त लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे.
AAP chief Arvind Kejriwal intensifies political focus in Punjab after facing setbacks in the Delhi Assembly elections.
AAP chief Arvind Kejriwal intensifies political focus in Punjab after facing setbacks in the Delhi Assembly elections.Sarkarnama
Published on
Updated on

बातमी थोडक्यात काय आहे?

  1. दिल्लीतील पराभवानंतर अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा फोकस पंजाबकडे वळला आहे.

  2. दिल्लीतील आंदोलनं व विरोधाची धुरा आतिशी व सौरभ भारद्वाज सांभाळत आहेत

  3. पंजाब गमावल्यास 'आप'ची राष्ट्रीय राजकारणातील पत आणि अरविंद केजरीवाल यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात येऊ शकतो

Arvind Kejriwal News : भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांच्या विरोधातील राजकारण करत दिल्लीतील सत्तेच्या व देशातील चर्चेच्या केंद्रस्थानी असणारे अरविंद केजरीवाल सध्या काय करत आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ते सध्या पंजाबमध्ये लक्ष ठेवून आहेत. दिल्ली विधानसभा निवडणूक गमावल्यानंतर केजरीवाल यांनी पंजाबवर जास्त लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे.

फेब्रुवारीमध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवत अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'ला सत्तेबाहेर ढकलले. भाजपने यंदाच्या निवडणुकीत 48 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. दिल्लीत भाजपने मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी रेखा गुप्ता यांच्याकडे सोपवली. विधासभेतील हा पराभव केजरीवाल यांच्यासाठी मोठा धक्काच होता.

यानंतर केजरीवाल यांनी दिल्लीची सगळी सूत्र'आप'तर्फे माजी मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांच्याकडे सोपवली आहेत. वेगवेगळ्या मुद्यांवरून आतिशी सातत्याने भाजप सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्या घडामोडींमध्ये केजरीवाल प्रत्यक्ष सक्रिय नसल्याचेच चित्र आहे. दिल्लीतील राजकीय वर्तुळातून ते सध्या अलिप्त असल्याचे दिसत आहे.

10 जून रोजी दिल्लीतील अनधिकृत झोपडपट्ट्यांवर कारवाई सुरु असताना आतिशी यांच्या नेतृत्त्वाखाली 'आप'ने जोरदार आंदोलन केले आणि त्यात पोलिसांनी आतिशी यांना ताब्यातही घेतले होते. केजरीवाल यांनी ट्विटरवरून या घटनेचा निषेध केला; पण रस्त्यावरील आंदोलनापासून ते दूरच होते. याच दिवशी केजरीवाल पंजाबमध्ये एका सरकारी योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात व्यग्र होते.

दिल्लीतील पराभवानंतर केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्तरावर फारशी काही भूमिका घेतलेली नाही. दिल्लीतील भाजप सरकारला घेरण्यासाठी 'आप' पुरेपूर प्रयत्न करत आहे. झोपडपट्टी हटवण्याची कारवाई असो वा खासगी शाळांमधील फीचा मुद्दा असो, 'आप'तर्फे भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. पण केजरीवाल या सगळ्यांत कुठेही आघाडीवर दिसले नाहीत.

दिल्लीसंदर्भात त्यांनी आंदोलने किंवा पत्रकार परिषदांतून आक्रमक भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे आतिशी आणि सौरभ भारद्वाज हेच 'आप'चे दिल्लीतील प्रमुख नेते असल्याचे चित्र सध्या आहे. तर केजरीवाल यांनी पंजाबवर लक्ष केंद्रीत केले आहे. पंजाबमधील 'आप' सरकारच्या कामावर केजरीवाल यांनी बारकाईने लक्ष देण्यास सुरुवात केली.

AAP chief Arvind Kejriwal intensifies political focus in Punjab after facing setbacks in the Delhi Assembly elections.
Nitish Kumar : एकनाथ शिंदेंचा 'लाडका भाऊ' नितीश कुमारांनाही तारणार? निवडणुकीआधी टाकला डाव

पंजाबमधील विधानसभा निवडणूक होण्यास अद्याप दोन वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे आतापासूनच तेथील संघटना मजबूत करणे व भाजप-काँग्रेसला जोरदार लढत देण्याचा केजरीवाल यांचा मानस आहे. कदाचित याचमुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तीनच दिवसांनी अरविंद केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह पक्षाच्या आमदार व मंत्र्यांची भेट घेतली होती.

मार्चनंतर जवळपास दर आठवड्याला केजरीवाल यांनी पंजाबला भेट देत आहेत. राज्य सरकारच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन, जाहीर सभा, रोड शो यांमध्ये केजरीवाल सक्रिय सहभागी होत आहेत. अर्थात, यामुळे मान यांच्याऐवजी केजरीवालच पंजाबचे मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत, अशी टीका विरोधी पक्षांनी सातत्याने केली आहे.

AAP chief Arvind Kejriwal intensifies political focus in Punjab after facing setbacks in the Delhi Assembly elections.
Karnataka CM: सिध्दरामय्याचं मुख्यमंत्री राहणार! या 7 कारणांमुळे त्यांची खूर्ची वाचली! डी.के. शिवकुमार यांचे स्वप्न भंगले

पंजाबवर एवढं लक्ष कशासाठी?

दिल्लीनंतर पंजाबही गमावले तर 'आप'साठी परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सातत्याने आव्हान देणारा नेता म्हणून केजरीवाल यांनी आपली राजकीय प्रतिमा उभी केली आहे. देशभरातील निवडणुकांमध्ये अपयश येत असले तरीही दशकभरापासून दिल्लीची सत्ता राखण्यात केजरीवाल यांना यश आले होते. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणातही केजरीवाल यांच्या भूमिकेला महत्त्व होते.

अशात आगामी विधानसभा निवडणुकीत पंजाबही हातातून गमावले तर 'आप'च्या प्रभावाला ओहोटी लागू शकते. केजरीवाल यांना मोठी भीती आहे ती म्हणजे म्हणजे त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जाही जाऊ शकतो. भाजप व काँग्रेसव्यतिरिक्त तिसरा देशव्यापी राजकीय पक्ष होण्याच्या केजरीवाल यांच्या महत्वाकांक्षेलाही मोठा धक्का बसू शकतो.

शिवाय दिल्लीतील आमदार कमी झाल्यामुळे राज्यसभा निवडणुकीत हाताशी पुरेसे संख्याबळ असणेही केजरीवाल यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. यामुळे कदाचित केजरीवाल यांनी दिल्लीतून लक्ष कमी करत पंजाब जिंकण्यावर भर दिला आहे. याचा फायदा किती व कधी होईल, हे येत्या काळात समजेलच.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न :

  1. प्रश्न: अरविंद केजरीवाल सध्या कुठे अधिक सक्रिय आहेत?
    उत्तर: केजरीवाल सध्या पंजाबच्या राजकारणात अधिक सक्रिय आहेत.

  2. प्रश्न: दिल्लीतील पराभवानंतर 'आप'ची भूमिका कोण सांभाळतेय?
    उत्तर: आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांनी दिल्लीतील नेतृत्व सांभाळले आहे.

  3. प्रश्न: पंजाबमध्ये केजरीवाल इतके लक्ष का देत आहेत?
    उत्तर: पंजाब गमावल्यास 'आप'ची राष्ट्रीय स्तरावरची ताकद कमी होऊ शकते.

  4. प्रश्न: दिल्लीतील झोपडपट्टी कारवाईच्या वेळी अरविंद केजरीवाल काय करत होते?
    उत्तर: तेव्हा ते पंजाबमध्ये सरकारी कार्यक्रमात सहभागी होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com