Amit Shah in Jalna : जालन्यात राजकारण तापणार; दानवेंसाठी अमित शाह तर काळेंसाठी ठाकरेंची तोफ धडाडणार

Jalna Loksabha constituency : विरोधकांनी माझ्या विरोधात विकासाचे मुद्दे घेऊन आमने-सामने चर्चा करावी असे,आव्हान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे विरोधकांना सभांमधून देत आहेत..
Jalna Loksabha constituency
Jalna Loksabha constituencySarkarnama

Jalna News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी आज सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जालन्यात येत आहेत. तर 10 मे रोजी महाविकास आघाडीचे जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत.

जालना लोकसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांना कडवी झुंज दिली होती. या निवडणुकीत त्यांचा केवळ आठ हजार मतांनी पराभव झाला होता. रावसाहेब दानवे हे सलग सहाव्यांदा जालना लोकसभा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jalna Loksabha constituency
Loksabha Election 2024 : पंकजा मुंडे, राठोड यांची ऑडिओ क्लिप व्हायरल; फॉर्म काढून घेण्याची केली विनंती...

काँग्रेसने यावेळी त्यांच्या विरोधात पुन्हा कल्याण काळे यांना उमेदवारी देत 2009 च्या निवडणुकीचा दाखला देत महायुती ला आव्हान दिले आहे. परंतु आता ती परिस्थिती राहिली नाही, भारतीय जनता पक्ष बदलला असून जालना लोकसभा मतदारसंघाचा कायापालट झाल्याचा दावा रावसाहेब दानवे यांच्याकडून केला जात आहे. विरोधकांनी माझ्या विरोधात विकासाचे मुद्दे घेऊन आमने-सामने चर्चा करावी असे, आव्हान रावसाहेब दानवे विरोधकांना सभांमधून देत आहेत . दरम्यान जालना लोकसभेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचल्यामुळे रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी जालन्यात सभा दिली आहे.

बुधवारी सायंकाळी ही सभा होत असून या सभेत अमित शाह काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे अमित शाह यांची सभा झाल्यानंतर शुक्रवारी 10 मे रोजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav-Thackeray) जालन्यात सभा घेणार आहेत. अमित शाह यांनी केलेले टीकेला ते या सभेतून कसे उत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. दरम्यान, जालन्यात महाविकास आघाडीचे कल्याण काळे यांच्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सभा घेत महायुतीवर टीकेची जोड उठवली आहे. त्यानंतर आता उद्याच्या भाषणातून उद्धव ठाकरे कोणावर निशाणा साधतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Jalna Loksabha constituency
Bajrang Sonwane News : मोदींनी द्वेषाचं राजकारण केलं, बीडचा पराभव चुकणार नाही; सोनवणे कडाडले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com