Aryan Khan: आर्यन खान पुन्हा समीर वानखेडेंच्या रडारवर! आता थेट दिल्ली हायकोर्टात होणार फैसला

Aryan Khan Vs Sameer Wankhede: आर्यन खानच्या पहिल्यावहिल्या दिग्दर्शनात तयार झालेल्या बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेबसीरिजमध्ये समीर वानखेडेंचं पात्र दाखवण्यात आलं आहे.
Aryan Khan Sameer Wankhede
Aryan Khan Sameer Wankhede
Published on
Updated on

Aryan Khan Vs Sameer Wankhede: बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या त्याच्या पहिल्या वहिल्या दिग्दर्शनात तयार झालेल्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' या वेब सीरिजमुळं चर्चेत आहे. याच वेब सीरिजमुळं आता अडचणीत देखील आला आहे त्याला माजी एनसीबी (नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो) अधिकारी समीर वानखेडे यांनी थेट कोर्टात खेचलं आहे. आर्यनच्या वेबसीरिजमध्ये समीर वानखेडे यांचं पात्र दाखवण्यात आल्यानं हे प्रकरण थेट दिल्ली हायकोर्टात पोहोचलं आहे.

नेटफ्लिक्स आणि रेड चिलीज एंटरटेन्मेंटनं या वेब सीरिजची निर्मिती केली आहे. या वेबसीरिजमध्ये वादग्रस्त ठरलेल्या बॉलिवूडच्या अनेक कलाकारांच्या कहान्या दाखवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात कारवाई करणारे आणि नंतर राजकीय चर्चेमुळं वादग्रस्त ठरलेले आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांचं विडंबनात्मक पात्र आर्यन खानच्या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. या वेब सीरिजमध्ये आपल्याशी संबंधित अपमानजनक पात्र दाखवण्यात आलं असल्याचा दावा वानखेडे यांनी आपल्या अब्रुनुकसानीच्या याचिकेत केला आहे. यामध्ये तब्बल दोन कोटी रुपयांचा मानहानीचा दावा त्यांनी दाखल केला आहे.

Aryan Khan Sameer Wankhede
Jalgaon Police : फेसबुकवरून महिलेशी मैत्री, खोटं लग्न आणि अत्याचार ; जळगाव पोलिसाचं कारस्थान उघड

या वेबसीरिजमध्ये समीर वानखेडेंसारखं पात्र पाहिल्यानंतर त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हीनं एका व्हिडिओद्वारे इशारा दिला आहे. यामध्ये तिनं समीर वानखेडे यांचा लहानपणीचा आणि मोठं झाल्यानंतर पोलीस अधिकारी झाल्याचा फोटो आहे, त्यात 'तुम जलन बरकरार रखना हम जलवे बरकरार रखेंगे' हे गाणं तिनं लावलं आहे.

Aryan Khan Sameer Wankhede
Ravindra Chavan : काँग्रेसच्या वडेट्टीवारांनी 6 महिन्यांचे वेतन पुरग्रस्तांना दिले..., भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, सर्वच आमदार गडगंज नाहीत!

मूळ प्रकरण काय?

२०२१ मध्ये मुंबईहून गोव्याला निघालेल्या कार्डिलिया क्रूझवर हायप्रोफाईल रेव्ह पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीची खबर कळताच नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे झोनल डिरेक्टर असलेल्या समीर वानखेडे यांनी आपल्या टीमसह छापेमारी केली होती. या छाप्यात बड्या उद्योगपतींची मुलं असलेले अरबाज मर्चंट, मुनमुन धमीचा आणि बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांना ताब्यात घेतलं होतं. या तिघांकडं ड्रग्ज आढळून आल्याचा दावा एनसीबीनं केला होता. आर्यन खानजवळ १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी, २१ ग्रॅम चरस आणि एमडीएमएच्या २२ गोळ्या आढळून आल्या असून या ड्रग्जची एकूण किंमत १,३३,००० रुपये असल्याचं त्यावेळी एनसीबीचं म्हणणं होतं.

Aryan Khan Sameer Wankhede
Ajit Pawar : अजितदादांनी घेतली शरद पवारांच्या आमदाराची फिरकी; ‘लोक आमदार-बिमदार झाल्यावर वाढतात, आपण...’

या प्रकरणात अटक झाल्यानंतर आर्यन खान तब्बल २५ दिवस तुरुंगात होता. त्यानंतर सबळ पुराव्यांअभावी त्याची सुटका झाली होती. पण त्यानंतर समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप झाले, याच प्रकरणात त्यांनी लाच घेतल्याचा आरोप झाला. तसंच त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी वानखेडे यांचं जात प्रमाणपत्र खोट असल्याचं सांगत आरोपांची राळ उडवून दिली होती. तसंच त्यांच्या नावावर वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच एक बारचा परवाना असल्याचेही आरोप त्यांनी केले होते. त्यामुळं हे प्रकरण भलतीकडंच ओढलं गेलं होतं. यामध्ये भाजपच्या अनेक नेत्यांचीही नावं समोर आली होती. त्यामुळं हे प्रकरण त्यावेळी बराच काळ चर्चेत राहिलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com