Ajit Pawar : अजितदादांनी घेतली शरद पवारांच्या आमदाराची फिरकी; ‘लोक आमदार-बिमदार झाल्यावर वाढतात, आपण...’

MLA Raju Khare News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 24 सप्टेंबरला सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, मोहोळ भागातील पूरग्रस्तांची गाऱ्हाणी ऐकून पाहणी केली. लांबोटी पुलावर त्यांनी आमदार राजू खरे यांची फिरकी घेतली.
Ajit Pawar-Raju Khare
Ajit Pawar-Raju KhareSarkarnama
Published on
Updated on
  1. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २४ सप्टेंबरला करमाळा, माढा आणि मोहोळ तालुक्यात पूरग्रस्त भागांची पाहणी करून मदत, पंचनामे व रस्ते दुरुस्तीसाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

  2. सीना नदीच्या महापुरामुळे १२४ गावांना फटका बसला असून पुणे-सोलापूर आणि सोलापूर-विजयपूर महामार्ग पहिल्यांदाच पाण्यामुळे बंद ठेवावे लागले.

  3. लांबोटी पुलावरील पुरस्थिती तपासताना पवार यांनी आमदार राजू खरे यांच्याशी हलक्या फुलक्या शब्दांत विनोद करत वातावरण हलके केले.

Solapur, 25 September : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (ता. 24 सप्टेंबर) सोलापूर जिल्ह्यातील पूरस्थिती आणि नुकसानीची पाहणी केली. करमाळ्यापासून त्यांनी माढा, मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्तांची गाऱ्हाणी ऐकून घेतली. शेवटी मोहोळ तालुक्यातील लांबोटी पुलावर सीना नदीला आलेल्या पुराची पाहणी करत असताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांची फिरकी घेतली.

अतिवृष्टीमुळे सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील 124 गावांना पुराचा फटका बसला आहे. सोलापूर जिल्हा आणि दक्षिण भारताला जोडणारे दोन राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवावे लागले हेाते. सीना नदील आलेल्या पुरामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील लांबोटी पुलाला पाणी लागले होते, त्यामुळे प्रशासनाने हा मार्ग बंद ठेवला हेाता. तसेच, सोलापूर-विजयपूर हा कर्नाटकशी जोडणाऱ्या महामार्गावर वडकळबाळ येथे पाणी आल्याने तोही बंद ठेवण्यात आला होता.

सोलापूर-पुणे महामार्गा इतिहासात पहिल्यांदा बंद ठेवावा लागला होता. अनेक शेतकऱ्यांचे संसार वाहून गेले आहेत. शेतीपिकेही तर वाहून गेलीच आहेत. याशिवाय जमीनही वाहून गेली आहे, त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर आला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच नुकसानाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सकाळी सातलाच करमाळा गाठले.

Ajit Pawar-Raju Khare
Sonam Wangchuk News : लडाखमध्ये आंदोलन सुरू असतानाच सोनम वांगचुक यांना धक्का; अमित शहांच्या गृह मंत्रालयाचं मोठं पाऊल

करमाळ्यात पूरग्रस्तांची चौकशी केली. तसेच, पुरात अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासंदर्भात तसेच, वाहून गेलेले रस्ते दुरुस्त करणे, पंचानामे आणि भरपाईबाबत अधिकाऱ्यांना सूचना केली. त्यानंतर त्यांनी माढ्यातही पाहणी केली. माढ्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी मोहोळ तालुक्यात नुसानाची आणि लांबोटी पुलावरून नीरा नदीला आलेल्या महाकाय पुराची पाहणी केली.

सीना नदीला आलेल्या पुराची पाहणी करत असताना सीना नदीत किती पाणी आहे, आता पाणी वाढणार नाही ना, पुलावरून पाणी गेलं नाही याबाबतची माहिती घेतली. याचवेळी आमदार राजू खरे (Raju Khare) यांनी जनावरे वाहून गेली आहेत, अशी आठवण करून दिली. त्यावेळी अजित पवार यांनी दूध अनुदान देताना प्रत्येक जनावरांना टॅगिंग केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांकडे किती जनावरे आहेत, याची माहिती आहे. त्यानुसार आपण शेतकऱ्यांना मदत करणार आहोत, असे पवारांनी स्पष्ट केले.

नुकसानीचे पंचनामे कसे होणार, तसेच भरपाई कशी मिळणार याबाबत सांगत असताना अजित पवार यांनी आमदार राजू खरे यांना उद्देशून आपण बऱ्यापैकी बरीक झालात, असा सवाल केला. त्यावर आमदार खरे यांनी 21किलो वजन कमी झाल्याचे सांगितले. त्यानंतर अजितदादा म्हणाले की, लोक आमदार-बिमदार झाल्यावर वाढतात, आपण कमी झालात, असे म्हणून पाहणी दौऱ्यादरम्यान अजितदादांनी खरेंची फिरकी घेतली आणि तणावाच्या काळात हास्याची लेकर उमटली.

Ajit Pawar-Raju Khare
Bihar Election: 85 वर्षांनंतर CWCची बैठक; तेलंगणाप्रमाणे बिहारमध्ये चमत्कार होणार का?
  1. प्र: अजित पवार यांनी सोलापूर दौऱ्यात कोणकोणत्या ठिकाणी पाहणी केली?
    उ: करमाळा, माढा आणि मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांमध्ये.

  2. प्र: सोलापूर जिल्ह्यात किती गावांना पुराचा फटका बसला?
    उ: अंदाजे १२४ गावे पूरग्रस्त झाली आहेत.

  3. प्र: कोणते मुख्य महामार्ग पाण्यामुळे बंद ठेवावे लागले?
    उ: पुणे-सोलापूर आणि सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्ग.

  4. प्र: दौऱ्यादरम्यान अजित पवार यांनी कोणाबाबत विनोदी टिप्पणी केली?
    उ: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांच्या वजन कमी झाल्याबाबत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com