Karnataka Election: बेळगावमध्ये 'नोटा'चे मतदार वाढले; 15 हजार मतदारांनी निवडला 'यापैकी नाही'चा पर्याय

Karnataka Election Result: बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात तब्बल 15 हजार मतं 'नोटा'ला पडली आहेत.
Karnataka Election
Karnataka ElectionSarkarnama

Karnataka Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 224 जागांपैकी 135 जागांवर विजय मिळवला. तर भाजपला फक्त 66 जागांवर विजय मिळवण्यात यश आले. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात तब्बल 15 हजार मतं 'नोटा'ला पडली आहेत.

कर्नाटक विधानसभेसाठी बुधवारी (दि.10) मतदान झाले. त्यानंतर शनिवारी (दि.13) मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यामध्ये रायबागला सर्वाधिक 1 हजार 860 मतं नोटाला झाले आहेत.

निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवारांसह प्रतिस्पर्धी उमेदवारांना पडलेली मते याची माहिती देण्यात आली. यामध्ये रिंगणातील उमेदवारांपैकी एकाही उमेदवार पसंतीला न आल्यास 'नोटा'ला मतदान करण्याचा पर्याय असतो. यामध्ये 15 हजार मते नोटाला पडली आहेत.

Karnataka Election
Karnataka Next CM: कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार?; डी के शिवकुमार यांनी दिले स्पष्ट संकेत

रायबागमध्ये 1 हजार 860 मतदान नोटाला झालं. तर रामदूर्गला 1646, बेळगाव दक्षिण 1599 मते नोटाला पडली. सौदत्तीत सर्वात कमी 169 नोटाला मतदान झालं. अथणीत 1037, बेळगाव ग्रामीण 1165, बैलहोंगल 1319, गोकाक 1060, यमकनमर्डी 996, कागवाड 985, चिक्कोडी सदलगा 957, कुडची 643, खानापूर 1236, निपाणी 919, हुक्केरी 1168, बेळगाव उत्तर 1161 आणि कित्तूरमध्ये 802 मतदान नोटाला झालं आहे.

Karnataka Election
Imtiaz Jalil News: कर्नाटकच्या विजयानंतर इम्तियाज जलीलही म्हणतात, आम्ही महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार...

दरम्यान, 'नोटा'ला मतदान करण्यात आल्यानंतर सरासरी मतदान टक्केवारीत मत ग्राह्य धरलं जातं. मात्र, रिंगणातील उमेदवारांच्या मतदानात त्याचा समावेश होत नाही. मात्र, या स्वरुपाच्या मतदानामुळे उमेदवारांचा निसटता पराभव होण्याची शक्यता असते. यासाठी निवडणूक विभागाकडून नोटाची जागृती केली जात नाही.

(Edited By : Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com