Asaduddin Owaisi News : ओवेसींचे मुस्लिमांना मोठं आवाहन; देशात शुक्रवारी दिसणार एकजुटता, अलर्टही केले...

Asaduddin Owaisi’s Response: A Call for Peaceful Protest : असदुद्दीन ओवेसी यांनी शुक्रवारी नमाजादरम्यान सर्व मुस्लिमांनी हातावर काळी पट्टी बांधून मशिदीत जावे, असे आवाहन केले.
Asaduddin Owaisi
Asaduddin OwaisiSarkarnama
Published on
Updated on

Pahalgam terror attack response : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल म्हणजेच AIMIM चे राष्ट्रीय अध्य़क्ष व हैदराबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही या हल्ल्यानंतर मुस्लिम बांधवांना मोठं आवाहन केले आहे. ओवेसी यांनी हल्ल्याचा निषेध करताना सर्व मुस्लिमांना शुक्रवारी एकजुटता दाखवावी, असे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी काश्मिरी मुस्लिमांनाही सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

ओवेसी यांनी गुरूवारी मीडियाशी बोलताना देशातील मुस्लिम बांधवांना साद घातली. ते म्हणाले, शुक्रवारी नमाजादरम्यान सर्व मुस्लिमांनी हातावर काळी पट्टी बांधून मशिदीत जावे. दहशतवादाविरोधात एकजुटता दाखविण्यासाठी आणि शांतीचा संदेश देण्यासाठी ओवेसी यांनी हे आवाहन केले आहे. त्यामुळे येत्या मशिदींमध्ये मुस्लिम बांधव एकजुट होऊन दहशतवादाला विरोध करतील.

Asaduddin Owaisi
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला दहा मोठे झटके; आता वाट लागणार...

हाताला काळी पट्टी बांधून भारतातील शांती कमजोर होऊ देणार नाही, असे संदेश देशाबाहेरील शक्तींना आम्ही देणार आहोत, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी काश्मीरमधील मुस्लिम बांधवांना सतर्क केले आहे. देशात अशांती पसरविणाऱ्या शक्ती काश्मिरी मुस्लिमांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करतील. अशावेळी सर्वांनी एकजूट दाखवत शत्रूची चाल उलटवणे खूप आवश्यक आहे. शत्रूच्या षडयंत्रामध्य अडकू नका, असेही ते म्हणाले आहेत.

ओवेसी यांनी सर्व भारतीयांनाही आवाहन केले आहे. भारतीयांनी कोणत्या धार्मिक आणि जातीयवादी राजकारणापासून दूर राहावे आणि एकजुटीने शांती आणि एकोप्याचे वातावरण कायम ठेवावे. दहशतवादाचा कोणताही धर्म नसतो. अशाप्रकारच्या भ्याड हल्ल्यांचा उद्देश देशामध्ये दुफळी निर्माण करणे हा असतो, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.

Asaduddin Owaisi
LOC tension : दहशतवादी हल्ल्यानंतर बॉर्डरवर मोठी घटना; भारतीय जवान पाकिस्तानच्या ताब्यात

दरम्यान, ओवेसी यांनी केलेले हे आवाहन महत्वपूर्ण मानले जात आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी गोळ्या झाडताना पर्यटकांना धर्म विचारला होता. हिंदू असल्याचे समजल्यानंतर त्यांनी गोळ्या झाडल्याचा दावा मृतांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. यापार्श्वभूमीवर ओवेसी यांनी हे आवाहन करत देशात एकोप्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com