FASTag Annual Pass: राष्ट्रीय महामार्गावरुन जाणार असाल, तर अधिकचे पैसे मोजावे लागणार; टोलच्या दरात मोठी वाढ

NHAI Increase annual toll pass prices from 1 April :1 एप्रिलपासून वार्षिक टोल पासच्या किंमतीत वाढ होणार असल्याचा निर्णय NHAI ने घेतला आहे. नवीन टोल दर, फास्टॅग आणि महामार्ग शुल्काची माहिती जाणून घ्या.
FASTag Annual Pass
FASTag Annual Pass Sarkarnama
Published on
Updated on

FASTag toll Update: वार्षिक टोल पासच्या किंमतीत 1 एप्रिलपासून वाढ होणार आहे. त्यामुळे नेहमी राष्ट्रीय महामार्गावरुन तुम्ही प्रवास करणार असला तर तुम्हाला आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅगच्या किमतीत 75 रुपयांनी वाढ केली आहे.

1 एप्रिल 2026 पासून नवीन दर लागू होणार असून लाखो वाहनचालकांवर याचा थेट परिणाम होणार आहे. वार्षिक टोल पाससाठी नवीन दर 2026-27 आर्थिक वर्षासाठी लागू असून. हा पास फक्त खाजगी (गैर-व्यावसायिक) वाहनांसाठी आहे आणि त्यासाठी सक्रिय FASTag आवश्यक आहे.

FASTag Annual Pass
पंतप्रधान कार्यालयाकडून चौकशीचे आदेश: भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर कोणते आरोप आहेत?

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) हा निर्णय घेतला आहे. वार्षिक टोल पासची किंमत वाढवली असून 1 एप्रिल 2026 पासून, वाहनचालकांना वार्षिक पाससाठी 3000 रुपयाऐवजी 3075 रुपये द्यावे लागणार आहे. या निर्णयामुळे काही वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

1 एप्रिल 2026 पासून लागू होणारे नवीन दर लागू करण्याचे आणि प्रवाशांना आणि इतर भागधारकांना माहिती देण्याचे निर्देश भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्व टोल प्लाझा आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. टोल दरांचा दरवर्षी आढावा आणि सुधारणा केली जाते. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, यावेळी वार्षिक पासच्या किमतीत थोडीशी वाढ करण्यात आली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दररोज किंवा वारंवार राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्यांसाठी वार्षिक टोल पास हा अजूनही एक सोयीस्कर पर्याय मानला जातो, कारण त्यामुळे वारंवार टोल भरण्याचा त्रास कमी होतो.

एक फेब्रुवारीपासून नवीन फास्टॅग घेण्यासाठी आवश्यक असलेली 'KYV' (Know Your Vehicle)ही प्रक्रिया आता NHAIने रद्द केली आहे. त्यामुळे लाखो वाहनचालकांना होणार मनस्ताप कमी झाला आहे

FASTag Annual Pass
Narendra Mehta : थेट पंतप्रधान कार्यालयाकडून CM फडणवीसांना भाजप आमदारावर कारवाईचा आदेश; तब्बल 400 कोटींची स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचा आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com