

Delhi protest latest political news: दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान कॉकरोच जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी केंद्र सरकारवर टीका करत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास लाखो विद्यार्थी पुन्हा दिल्लीत येतील, असा दावा त्यांनी केला.
सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ता आशुतोष रांका म्हणाले, "स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या इतिहासातील हे सर्वात मोठे आंदोलन आहे. 20 जुलै रोजी जे घडले, तो केवळ ट्रेलर होता. केंद्रातील मोदी सरकारने (Central Government) आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर यापेक्षाही मोठ्या संख्येने विद्यार्थी दिल्लीत येतील. यावेळी आम्ही मागे हटणार नाही."
केंद्रातील भाजप (BJP) सरकारने वेळेत निर्णय घ्यावा, अन्यथा देशातील युवक तीव्र प्रतिक्रिया देतील, असेही त्यांनी म्हटले. दिल्ली पोलिसांकडून आंदोलनाला हिंसक स्वरूप देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी आंदोलन शांततापूर्ण असल्याचा दावा केला.
रांकांच्या म्हणण्यानुसार, 20 जुलै रोजीचा मोर्चाही शांततेत सुरू होता. मात्र, पोलिसांनी विद्यार्थ्यांवर बळाचा वापर केल्यामुळे परिस्थिती बिघडल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या 31 दिवसांपासून आंदोलनकर्ते महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार शांततापूर्ण आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनाशी संबंधित मागण्यांबाबत अभिजित दीपके यांनीही भूमिका मांडल्याचे सांगत रांका म्हणाले की, आंदोलनात सहभागी झालेल्या कोणत्याही आंदोलकाविरोधात दाखल करण्यात आलेले किंवा भविष्यात दाखल होणारे एफआयआर स्वीकारले जाणार नाहीत. संबंधित कारवाई मागे घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.
आमच्या नेतृत्वाविरोधात एफआयआर दाखल झाल्याची भीती नसल्याचे सांगताना त्यांनी यूएपीए (UAPA) किंवा एनएसए (NSA) अंतर्गत कारवाईलाही सामोरे जाण्याची तयारी असल्याचा दावा केला. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, अगदी भाजपमधील इच्छुकांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.