Asia Cup 2025 update : भारताला ट्रॉफी देईन, पण..! ‘पाक’च्या मंत्र्यांनी घातली कधीच मान्य होणार नाही अशी अट...

Asia Cup 2025 Trophy Controversy Explained : कोणत्याही सोहळ्याशिवाय आशिया चषकाचा समारोप झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. आता नक्वी यांनी एक अट घालत ट्रॉफी परत करण्याची तयारी दाखवली आहे.
“Pakistan minister Mohsin Naqvi readiness to hand Asia Cup 2025 trophy to India with conditions.”
“Pakistan minister Mohsin Naqvi readiness to hand Asia Cup 2025 trophy to India with conditions.”Sarkarnama
Published on
Updated on

Mohsin Naqvi’s Condition for Handing Trophy to India : आशिया चषक 2025 वर भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानला पराभूत करत नाव कोरले. पण भारतीय क्रिकेटपटूंनी एशियन क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी व पदके स्वीकारण्यास नकार दिला. हा अपमान सहन न झालेल्या नक्वी यांनी स्टेडियममधून ट्रॉफीसह घेऊन पळ काढला होता. आता दोन दिवसांनंतर एका अटीवर ट्रॉफी आणि पदके बहाल करण्याची तयारी नक्वी यांनी दर्शविली आहे.

नक्वी हे पाकिस्तान सरकारमध्ये मंत्री असल्याने भारतीय संघाने त्यांच्या हातून ट्रॉफी न स्वीकारण्याची भूमिका घेतली होती. त्यावरून दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये अंतिम सामन्याचा निकाल आल्यानंतर बराच वेळ वाद सुरू होता. भारतीय संघ आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर नक्वी यांनी काढता पाय घेतला. भारतीय संघही मुंबईत दाखल झाला आहे.

कोणत्याही सोहळ्याशिवाय आशिया चषकाचा समारोप झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. आता नक्वी यांनी एक अट घालत ट्रॉफी परत करण्याची तयारी दाखवली असल्याचे वृत्त आहे. अद्याप नक्वी यांच्याकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. ‘क्रिकबझ’ने याबाबतचा दावा केला आहे. नक्वी यांनी आयोजकांकडे याबाबतचा प्रस्ताव पाठविल्याचे त्यात म्हटले आहे.

“Pakistan minister Mohsin Naqvi readiness to hand Asia Cup 2025 trophy to India with conditions.”
Ex CJI Chandrachud : मोठी बातमी : माजी CJI चंद्रचूड यांचे अयोध्येबाबतचे ‘ते’ विधान वादात; राम मंदिर निकालाविरोधात होऊ शकते याचिका

नक्वी यांच्या अटीनुसार, ते सूर्यकुमार यादव आणि संघातील इतर खेळाडूंना ट्रॉफी आणि मेडल देण्यास तयार आहेत. पण त्यासाठी एक सोहळा आयोजित करावा लागेल. माझ्याच हस्तेच त्यांना ट्रॉफी दिली जाईल, अशी अटक नक्वी यांनी घातली आहे. सध्याची भारत आणि पाकिस्तानातील राजकीय स्थिती पाहता नक्वी यांची अट मान्य होणे अशक्य आहे. त्यामुळे आता हा मुद्दा अधिकच तापणार असल्याचे चित्र आहे.

“Pakistan minister Mohsin Naqvi readiness to hand Asia Cup 2025 trophy to India with conditions.”
Mumbai Terror Attack news : चिदंबरम यांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, 'पाक'चा बदला घेण्याचा विचार होता, पण...

भारताने पाकिस्तानला नमवत विजय मिळविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियात पोस्ट करत क्रिकेटपटूंचे अभिनंदन करताना ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला होता. त्यावरून पाकिस्तान सरकारमधील काही मंत्र्यांचा तीळपापड झाला होता. त्यातच क्रिकेटपटूंही नक्वी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिल्याने या मुद्द्याला राजकीय स्वरुप आले आहे. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळानेही यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट करताना खेळाडूंना समर्थन दिले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाकडे नक्वींच्या कृतीची तक्रार केली जाणार आहे.     

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com