Assam Muslim Marriage Act : आसाम सरकारने घेतला मोठा निर्णय! ; मुस्लिम विवाह अन् तलाक कायदा रद्द

Assam Government on Assam Muslim Marriage Act : आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांनी हा कायदा संपुष्टात आणण्याचे हेतू नेमका काय आहे, हे देखील स्पष्ट केलं आहे.
Assam  Chief Minister Himanta Sarma
Assam Chief Minister Himanta SarmaSarkarnama
Published on
Updated on

Assam Chief Minister Himanta Sarma on Muslim Marriage Act : आसाम सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुस्लिम विवाह कायदा व तलाक नोंदणी कायदा आणि नियम 1935 रद्द करण्यात आले आहेत. याबाबात आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी माहिती दिली की, हा कायदा संपुष्टात आणण्याचे हेतू लैंगिक न्याय आणि बाल विवाह रोखणे हा आहे.

या निर्णयाबाबत सरमा म्हणाले, आसाम मुस्लिम विवाह अधिनियमानुसार बाल विवाहास परवानगी होती. आम्ही हे संपुष्टात आणले आणि अध्यादेश आणला. आत आम्ही या अध्यादेशाला विधेयक बनवू. एक नवा कायदा येईल ज्यानुसार मुस्लिम विवाहांची नोंदणी 18 आणि 21 वर्षाच्या कायदेशीर वयोमर्यादेच्या आत शासकीय कार्यालयांमध्ये होईल.

जर 80 टक्के बाल विवाह अल्पसंख्यांकामध्ये होत असतील तर 20 टक्के बहुसंख्य समुदायात होत आहेत. मी बालविवाहास धार्मिक दृष्टिकोनातून बघत नाही. आमचा प्रयत्न आहे की लैंगिक न्याय व्हावा आणि बाल विवाहाचे प्रमाण कमी व्हावेत, आसामध्ये बालविवाह संपुष्टात येण्याच्या काठावर आहेत.

Assam  Chief Minister Himanta Sarma
Nitish Kumar Vs Prashant Kishor : नितीश कुमारांना झटका; बडा नेता प्रशांत किशोर यांच्या गळाला

मुख्यमंत्री सरमा यांनी असेही सांगितले की, आम्ही बाल विवाहाविरोधात अतिरिक्त सुरक्षा उपाय करून आपल्या मुली आणि भगिनींसाठी न्याय सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. आज आसाम कॅबिनेटच्या बैठकीत आम्ही Assam Repealing Bill 2024 द्वारे मुस्लिम विवाह आणि तलाक नोंदणी अधिनियम 1935 रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Assam  Chief Minister Himanta Sarma
Pooja Khedkar Case Update : 'केवळ निलंबन चालणार नाही, अशा लोकांकडून..' ; 'LBSNAA'च्या माजी प्रमुखांचं मोठं विधान!

पुढे मुख्यमंत्री सरमा यांनी सांगितलं की, या कायद्याचा उद्देश आसाम मुस्लिम विवाह आणि घटस्फोट कायदा 1935 आणि आसाम मुस्लिम विवाह आणि तलाक नोंदणी नियम 1935 रद्द करणे आहे. आसाम मंत्रिमंडळाने हे देखील निर्देश दिले आहेत की, राज्यात मस्लिम विवाहांच्या नोंदणीसाठी कायदा आणला जाईल आणि या मुद्य्यावरही विधानसभेत चर्चा केली जाईल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com