Sanjeev Chopra on Pooja Khedkar
Sanjeev Chopra on Pooja KhedkarSarkarnama

Pooja Khedkar Case Update : 'केवळ निलंबन चालणार नाही, अशा लोकांकडून..' ; 'LBSNAA'च्या माजी प्रमुखांचं मोठं विधान!

Former LBSNAA chief Sanjeev Chopra on Pooja Khedkar News : 'या प्रकरणी तीन अँगलवर जोर दिला गेला पाहीजे आणि ते अँगल म्हणजे...' असंही संजीव चोपडा यांनी सांगितलं आहे.
Published on

Pooja Khedkar and Sanjeev Chopra News : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण दिवसेंदिवस वाढत आहे. याप्रकरणी आता लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी(एलबीएसएनएए)चे माजी प्रमुख संजीव चोपडा यांचे विधान समोर आले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, जे लोक खोट्या जात आणि दिव्यंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे प्रशासकीय सेवांमध्ये सहभागी होतात, त्यांना केवळ निलंबित करून चालणार नाही. अशा लोकांकडून प्रशिक्षणासाठी झालेला खर्च आणि आतापर्यंत त्यांना दिलं गेलेलं वेतनही वसूल केलं गेलं पाहीजे. पूजा खेडकरवरून सोशल मीडियवार अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

'एलबीएसएनएए' माजी प्रमुख चोपडा यांचे म्हणणे आहे की, आपल्या सिस्टमची ही खराबी आहे. असा अपराध करणाऱ्यांकडून वेतन आणि प्रशिक्षणावर झालेला खर्च वसूल केला गेला पाहीजे. अशा अधिकाऱ्यांना शिक्षा दिली गेली पाहीजे. ज्यामुळे अन्य अधिकाऱ्यांनाही धडा मिळेल. अशा लोकांना जे कोणी वाचवण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहीजे. या गुन्ह्यांमध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तिला दंड दिला गेला पाहीजे. त्यांनी म्हटले की, सत्यता पडताळणाऱ्या समितीने सक्रिय होवून, या प्रकरणाच्या तळाशी गेलं पाहीजे.

Sanjeev Chopra on Pooja Khedkar
Video Manorama khedkar : मोठी बातमी! IAS पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांना अटक

चोपडा म्हणाले की, या प्रकरणी तीन अँगलवर जोर दिला पाहीजे. पहिला - पुण्यात नियुक्तीच्या कालावधीतील गैरवर्तनाची चौकशी केली गेली पाहीजे. राज्य सरकार हे प्रकरण पाहत आहे. दुसरा अँगल म्हणजे, खोट्या प्रमाणपत्रांच्या तपासणीसाठी केंद्रीय कर्मिक न्यायालयाने चौकशी समितीची स्थापना केली आहे. तिसरा अँगल - सिस्टममध्ये गडबडी. विश्वासर्हता सुनिश्चित करण्यासाठी संपूर्ण प्रकरणाची चौकशी आवश्यक आहे.

दरम्यान, प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर(Pooja Khedkar) यांची आई मनोरमा खेडकर यांना पौड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मनोरमा खेडकर यांनी मुळशीतील शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवल्या प्रकरणी पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून मनोरमा खेडकर आणि त्यांचे पती दिलीप खेडकर हे फरारी झाले होते.

Sanjeev Chopra on Pooja Khedkar
Manorama Khedkar: वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांची आई मनोरमा कशी सापडली पोलिसांच्या जाळ्यात?

मनोरमा खेडकर(Manorama Khedkar) या रायगडमधील महाड येथे लपून बसल्या होत्या. याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी फार्म हाऊसवर छापा मारून मनोरमा यांना अटक केल्याची माहिती आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com