Nitish Kumar Vs Prashant Kishor : नितीश कुमारांना झटका; बडा नेता प्रशांत किशोर यांच्या गळाला

JDU Jan Surajya Abhiyan Bihar Assembly Election : प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये आपल्या संघटनेची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
Nitish Kumar, Prashant Kishor
Nitish Kumar, Prashant KishorSarkarnama
Published on
Updated on

Patna : बिहारमध्ये पुढील काही महिन्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीआधीच राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री नितीश कुमारांना धक्का दिला आहे. संयुक्त जनता दलाच्या बड्या नेत्याने पक्षाला रामराम ठोकत प्रशांत किशोर यांना साथ दिली आहे.

जेडीयूचे नेते व प्रदेश सचिव मोहम्मत इरफार यांनी गुरूवारी पक्षाच्या सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते प्रशांत किशोर यांच्या जन सुराज्य अभियानात सामील झाले. बिहारमधील जमूईसह इतर मुस्लिमबहुल भागात मोहम्मद इरफान यांचा प्रभाव आहे.

Nitish Kumar, Prashant Kishor
BJP Politics : भाजपला 'या’ दोन नेत्यांशी शत्रुत्व परवडणारं नाही; आता हाता-पायाच पडावं लागणार...

जेडीयूच्या अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांसह विविध पदे त्यांनी भूषवली आहेत. त्यामुळे मोहम्मद इरफान यांच्या जन सुराज्य अभियानात प्रवेशाने जेडीयू झटका बसला आहे. मागील काही दिवसांपासून विविध संघटनाचे लोक प्रशांत किशोर यांना साथ देत असल्याचे दिसत आहे.

लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलातील काही पदाधिकारीही प्रशांत किशोर यांना साथ देत आहेत. त्यामुळे आरजेडीने काही दिवसांपूर्वीच पत्रक काढत पदाधिकाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. जनसुराज्यमध्ये जाऊ नये, असे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले होते. तसेच कारवाईचा इशाराही देण्यात आला होता.

Nitish Kumar, Prashant Kishor
Pooja Khedkar : पूजा खेडकर यांच्यानंतर कोण? अतिरिक्त जिल्हाधिकारी देसाईंची घोडेस्वारी वादात...

या पत्रकावर प्रशांत किशोर यांनी पलटवार केला होता. पण त्यानंतर आरजेडीने दुसरे पत्र काढत दोन नेत्यांना पक्षातून बाहेर रस्ता दाखवला. हे दोन नेते जनसुराज्यमध्ये सामील झाल्याच्या कारणास्तव त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, प्रशांत किशोर हे आगामी विधानसभा निवडणुकीत नितीश कुमारांसह तेजस्वी यादव यांची डोकेदुखी वाढवणार असल्याची चर्चा आहे. विविध पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना सोबत घेत ते राज्यात आपला पाया मजबूत करत आहेत. त्यांना अनेकांची साधही मिळत असल्याने विधानसभेत जेडीयू आणि आरजेडीला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com