Ripun Bora : ममतांना मोठा धक्का; बड्या नेत्याने पक्षाला ठोकला रामराम

Mamata Banerjee TMC Assam : रिपून बोरा यांनी 2022 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
Ripun Bora, Mamata Banerjee
Ripun Bora, Mamata BanerjeeSarkarnama
Published on
Updated on

Guwahati : पश्चिम बंगालमध्ये रेप-मर्डर प्रकरणात आरोपीच्या धनी होत असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसच्या आसामच्या प्रदेशाध्यक्षांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. एवढेच नाही तर त्यांनी राजीनामा देताना पक्षाला आरसा दाखवला आहे.

आसामचे टीएमसीचे प्रदेशाध्यक्ष रिपून बोरा यांनी रविवार पक्षाला रामराम ठोकला. ते 2022 मध्येच काँग्रेस सोडून ममतांसोबत आले होते. त्यांच्यावर लगेच आसाममध्ये पक्षवाढीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण राजीनामा देताना त्यांनी पक्षाला लोक स्वीकारायला तयार नसल्याचा मोठा दावा केला आहे.

Ripun Bora, Mamata Banerjee
MIM candidate Anis Sundke News : एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके यांनी भरला उमेदवारी अर्ज !

तृणमूल काँग्रेस हा केवळ पश्चिम बंगालमधील प्रादेशिक पक्ष असल्याची लोकांची भावना असून ते पक्षाला स्वीकारत नाहीत, असे बोरा यांनी महासचिव अभिषेक बॅनर्जी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. आसामध्ये पक्षवाढीसाठी नेतृत्वाकडे अनेक शिफारशी केल्या पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊ शकली नाही. राज्यात पक्षामध्ये खूप क्षमता असूनही काही अडचणीमध्ये प्रगती होत नाही, असे बोरा यांनी म्हटले आहे.

आसामी नेतृत्वाची देशपातळीवर नियुक्ती करणे, कोलकाता येथील भूपेन हजारिका यांचे निवासस्थान हेरिटेज म्हणून जाहीर करणे, कुचबिहारमधील मधूपुर सतरा हे ठिकाणी सांस्कृतिक हब म्हणून विकसित करणे, आदी शिफारशी करण्यात आल्या होत्या. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पक्ष सोडत असल्याचे बोरा यांनी म्हटले आहे.

Ripun Bora, Mamata Banerjee
Nitish Kumar : नितीश कुमारांच्या पक्षात कलह; बड्या नेत्यानं दिला पदाचा राजीनामा

बोरा हे राज्यसभेचे माजी खासदार असून ते टीएमसीमध्ये येण्यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. तर आसाममधील तत्कालीन काँग्रेस सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणूनही काम केले आहे. त्यांची पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी होणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्याकडून देशभरात पक्ष वाढविण्यासाठी मागील काही वर्षांपासून प्रयत्न केला जात आहे. पण त्यांना अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. पश्चिम बंगाल वगळता अन्य कोणत्याही राज्यात त्यांचा आमदार किंवा खासदार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com