Nitish Kumar : नितीश कुमारांच्या पक्षात कलह; बड्या नेत्यानं दिला पदाचा राजीनामा

JDU KC Tyagi Rajiv Ranjan : के. सी. त्यागी हे नितीश कुमारांचे पक्षातील सुरूवातीपासूनच सहकारी आहेत. त्यांच्या विधानांमुळे पक्षात नाराजी असल्याची चर्चा होती.
KC Tyagi, Nitish Kumar
KC Tyagi, Nitish KumarSarkarnama
Published on
Updated on

Patna : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संयुक्त जनता दलाला धक्का बसला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे जून सहकारी व पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा पक्षाने स्वीकारला आहे. त्यामुळ जेडीयूमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याचे समोर आले आहे.

त्यागी हे जेडीयू पक्षातील वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रवक्तेपदाच्या राजीनाम्याला महत्व प्राप्त झाले आहे. त्यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले असले तरी त्यांची मागील काही दिवसांतील विधाने कारणीभूत असल्याची चर्चा आहे. त्यागी यांच्या जागी राजीवर रंजन यांची राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली.

KC Tyagi, Nitish Kumar
Sheikh Hasina : शेख हसीना यांना लवकरच भारत सोडावा लागणार ; बांगलादेशात आणखी गुन्हे दाखल!

पक्षाचे महासचिव आफाक अहमद खान यांनी जारी केलेल्या पत्रामध्ये याबाबत माहिती दिली आहे. त्यागी हे पक्षातील अनेक वर्षांपासून प्रभावी नेते राहिले आहे. पण मागील काही दिवसांतील त्यांची विधान पक्षाच्या भूमिकेशी विसंगत असल्याने नाराजी निर्माण झाली होती. पक्षातील नेत्यांशी चर्चा न करता ते वैयक्तिक मते मांडत असल्याचा आरोप केला जात होता. या कारणाने पक्षांतर्गत मतभेद वाढले होते.

केवळ जेडीयू नव्हे तर एनडीएमध्येही मतभेदाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यागी यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणावरच बोट ठेवले होते. इस्त्रायल मुद्द्यावरून त्यांनी इंडिया आघाडीच्या सुरात सूर मिसळले होते. एससी, एसटी आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाच्या निकालावर त्यांनी पक्षाच्या विपरित भूमिका मांडली. यूपीएससीच्या परीक्षेविना भरतीवरही त्यागी यांनी टीका केली होती.

KC Tyagi, Nitish Kumar
Shyam Rajak News : लालूंना झटका देणारे श्याम रजक अखेर 'या' पक्षात जाणार; मुहूर्तही ठरला!

त्यागी यांनी अनेकदा आपले वैयक्तिक विचार मांडताना पक्षाला अडचणीत आणले. त्यामुळे पक्षाच्या नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित झाल्याचा दावा इतर नेत्यांकडून केला जात होता. त्यामुळे अशा स्थितीत त्यागी यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने पक्षातील मतभेद उघड झाले आहे. त्यागी यांचा राजीनामाही तातडीने स्वीकारण्यात आला आहे.

बिहारमध्ये पुढील काही महिन्यात विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार आहे. त्याआधी नितीश कुमार यांच्याकडून एनडीएच्या माध्यमातून पक्षाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण विविध मुद्यांवर पक्षातील मतभेद दूर करण्यात त्यांना अपयश येत असल्याचे दिसत आहे. एनडीएतील दुसरे सहकारी चिराग पासवान यांच्याकडून मात्र आरक्षणासह भरतीच्या मुद्यावरही एनडीएविरोधी भूमिका घेतली जात आहे. त्याचाही फटका नितीश कुमार यांच्या पक्षाला बसण्याची भीती नेत्यांना आहे. 

दरम्यान, आपण केवळ प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. मी अजूनही पक्षातच आहे. पक्षाचे सल्लागार म्हणून काम करण्यास नितीश कुमारांनी सांगितले आहे. मी पक्षातच राहणार असल्याचे त्यागी यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com