BJP, Congress
BJP, Congress Sarkarnama

Assembly Bypolls : लोकसभेनंतर मोदींची 7 राज्यांत आज पहिली परीक्षा; काँग्रेसनंही लावली ताकद...

NDA India Alliance Modi Government Narendra Modi Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर सलग तिसऱ्यांदा सत्तास्थापन केली आहे.   

New Delhi : लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा यश मिळवत नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्याला महिना उलटून गेल्यानंतर आज त्यांची पहिली परीक्षा आहे. देशातील सात राज्यांतील 13 विधानसभा मतदारसंघात बुधवारी पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे.

लोकसभेनंतर हे पहिलेच मतदान होत असल्याने एनडीए विरुध्द इंडिया आघाडी असा सामना पुन्हा पाहायला मिळणार आहे. सकाळी सात वाजता मतदानाला सुरूवात झाली असून सायंकाळ सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.

या मतदारसंघात मतदान

बिहारमधील रुपौली, पश्चिम बंगालमधील रायगंज, राणाघाट दक्षिण, बगदाह आणि मणिकला, तमिळनाडूतील विक्रवंडी, मध्य प्रदेशातील अमरवरा, उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि मंगलाउर, पंजाबमधील जालंधर पश्चिम, हिमाचल प्रदेशातील देहरा, हमीरपूर आणि नालागड या मतदारसंघात निवडणूक होत आहे.

BJP, Congress
Hathras Stampede : भोलेबाबा सोडून सगळे जबाबदार; SDM, तहसिलदार, दोन पोलिसांसह सहा जण निलंबित

काही आमदारांचे निधन तसेच लोकसभा निवडणूक लढण्यासाठी आमदारकीचा राजीनामा दिल्याने या जागांवर मतदान होत आहे. निवडणुकीनंतर तीन दिवसांनी म्हणजे 13 जुलैला मतमोजणी होणार आहे. लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित यश मिळालेल्या इंडिया आघाडीला या निवडणुकीतही यशाची अपेक्षा आहे.

बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये थेट लढत होत आहे. लोकसभात टीएमसीने भाजपला फारसे यश मिळू दिले नाही. आज होत असलेल्या मतदारसंघांमध्ये चारपैकी तीन मतदारसंघातून भाजपचे उमेदवार 2021 मध्ये निवडून आले होते. नंतर त्यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक महत्वाची मानली जात आहे.

BJP, Congress
Pramod Sawant Government Cabinet Expansion : गोवा मंत्रिमंडळात मोठा फेरबदल, 3 नव्या चेहऱ्यांना संधी ? मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

मुख्यमंत्र्यांची पत्नी रिंगणात

हिमाचल प्रदेशात तीन अपक्ष आमदारांनी राजीनामा दिल्याने निवडणूक होत आहे. भाजपने या तिघांना उमेदवारी दिली आहे. डेहरा मतदारसंघातून काँग्रेसने मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे.

उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होत आहे. तर पंजाबमध्ये आप, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत आहे. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आरजेडीचे तेजस्वी यादव यांनी एकमेव मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com