Assembly Election Results : जगनमोहन, पटनायक यांना मोठा धक्का; भाजप दोन राज्यांत पहिल्यांदाच येणार सत्तेत?

Andhra Pradesh Odisha Assembly Election 2024 Results : आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांत सत्तांतर होणार असल्याचे सुरूवातीच्या कलांवरून दिसत आहे. दोन्ही राज्यांत भाजपप्रणित आघाडीची सत्ता येऊ शकते.
JaganMohan Reddy, Naveen Patnaik
JaganMohan Reddy, Naveen PatnaikSarkarnama

Assembly Election 2024 Update : दोन दिवसांपुर्वीच अरुणाचल प्रदेशमध्ये सत्ता मिळवल्यानंतर भाजप पहिल्यांदाच ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये सत्ता स्थापन करू शकते. सुरूवातीच्या कलांमध्ये दोन्ही राज्यांत भाजपप्रणित आघाडीने मुसंडी मारली आहे.

आंध्र प्रदेशात भाजपने तेलगू देसम आणि जनसेवा पक्षासोबत आघाडी केली आहे. या आघाडीला 175 पैकी तब्बल 110 जागांवर मोठी आघाडी मिळाली आहे. हे सुरूवातीचे कल असले तरी त्यामध्ये फारसा बदल होणार नाही असे दिसते. विद्यमान मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआरसीपी पक्षाचे केवळ 19 उमेदवार आघाडीवर आहेत.

एक्झिट पोलमध्ये जगनमोहन यांच्या विरोधात अंदाज वर्तवण्यात आले होते. हे अंदाज खरे होताना दिसत आहेत. राज्यात काँग्रेसचा एकही उमेदवार आघाडीवर नाही. आंध्र प्रदेशात भाजपप्रणित आघाडीची सत्ता आल्यास कर्नाटकनंतर सत्तेत येणारे दक्षिण भारतातील हे दुसरे राज्य ठरले.

JaganMohan Reddy, Naveen Patnaik
Lok Sabha Election 2024 Result : उत्तर प्रदेशात होणार उलटफेर; कमळामागे सायकल सुसाट

ओडिशात पटनायक यांची जादू संपली

पटनायक कुटुंब आणि ओडिशा हे समीकरण या निवडणूकीत दुभंगणार असल्याचे चित्र आहे. राज्यातील 147 जागांपैकी आतापर्यंत 68 जागांचे कल हाती आले असून त्यामध्ये भाजपचे 38 उमेदवार आघाडीवर आहेत.

विद्यमान मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाच्या 23 उमेदवारांना आघाडी मिळालेली आहे. राज्यात काँग्रेसचे पाच उमेदवार सुरूवातीच्या कलांमध्ये आघाडीवर आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com