Lok Sabha Election 2024 Result : उत्तर प्रदेशात होणार उलटफेर; कमळामागे सायकल सुसाट

Lok Sabha Election Result NDA Vs India Alliance Election Commission of India Result : लोकसभा निवडणुकीच्या निकालात सुरूवातीच्या कलांमध्ये देशात पुन्हा भाजपची सत्ता येणार असल्याचे चित्र आहे.
Akhilesh Yadav
Akhilesh YadavSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh Election Result Live Update : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीतील सुरूवातीच्या काही फेऱ्यांमधील कल हाती आले असून ‘एनडीए’ने मोठी आघाडी घेतली आहे.

मात्र, उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. राज्यात सुरूवातीच्या कलांमध्ये सकाळी 9.30 पर्यंत समाजवादी पक्षाचे 33 उमेदवार आघाडीवर आहेत.

उत्तर प्रदेशात भाजपला जमतेम 40 जागांवर आघाडी मिळाली आहे. देशात सर्वाधिक 80 जागा असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपचा मागील निवडणुकीच्या तुलनेत जागा कमी होण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. अखिलेश यादव यांच्या सपाने सर्वांनाच धक्का दिला आहे. काँग्रेसचेही सहा उमेदवारांनी विजयाच्या दिशेने आगेकुच केली आहे.

उत्तर प्रदेशात भाजपला यावेळी 70 हून अधिक जागा मिळतील, असा आशावाद पक्षाच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात होता. पण सुरूवातीच्या कलांमध्ये भाजप मागील निवडणुकीत मिळालेल्या जागांचा आकडाही पार करू शकणार नाही, असे चित्र आहे. बिहारमध्ये मात्र 40 पैकी 30 जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहे. त्यामुळे यूपीचे कसर बिहारने भरून काढल्याचे दिसते.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, 281 मतदारसंघातील कल समोर आले असून त्यापैकी एका जागेवर भाजपचा विजय झाला असून 169 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे 65 उमेदवार आघाडीवर असून त्यापाठोपाठ सपाचे 33 उमेदवार आघाडीवर आहे.

आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाने 10 जागांवर आघाडी घेतली आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे सहा तर उध्दव ठाकरेंचे तीन उमेदवार आघाडीवर असल्याचे सध्याचे कल आहेत. आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये चार जागांवर आघाडी घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com