Assembly Election Results : अरुणाचलमध्ये भाजपचा डंका, अजितदादांचीही कमाल; सिक्कीममध्ये SKM ची जादू

Arunachal Pradesh Sikkim Assembly Election Results : अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून पुन्हा सत्ताधारी पक्ष सत्तेत येणार असल्याचे चित्र आहे.
Arunachal Pradesh Sikkim Result
Arunachal Pradesh Sikkim ResultSarkarnama

Election Commission of India : अरुणाचल प्रदेश व सिक्कीम राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. अरुणाचलमध्ये पुन्हा सत्ताधारी भाजप तर सिक्काममध्ये सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने बहुमताचा आकडा पार केला आहे.   

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, सकाळी 11 वाजेपर्यंत 60 जागा असलेल्या अरुणाचलमध्ये भाजपला 15 जागांवर विजय मिळाला असून 31 जागांवर आघाडीवर आहे. मागील निवडणुकीत भाजपला 41 जागा मिळाल्या होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अरुणाचलमध्ये काँग्रेसला केवळ तीन जागांवर आघाडी आहे. मागच्या निवडणुकच्या तुलनेत काँगेसची एक जागा कमी होताना दिसत आहे. राज्यात पुन्हा एकदा काँग्रेस अपयशी ठरली असून भाजपने एकहाती सत्ता मिळवण्याचे दिशेने वाटचाल सुरू ठेवली आहे.

भाजपनंतर नॅशलन पीपल्स पार्टीला (NPEP) सहा जागांवर आघाडी असून एका अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत 16 जागांचे निकाल जाहीर झाले असून सर्वाधिक 15 उमेदवार भाजपचे आहेत. भाजपचे दहा उमेदवार यापुर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.

Arunachal Pradesh Sikkim Result
Lok Sabha Election Exit Poll : 'मोदीराज'ची हॅटट्रीक; तर इंडिया आघाडीला 'अच्छे दिन'? काय सांगतात एक्झिट पोलचे आकडे...

अजित पवारांना तीन जागांवर आघाडी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही राज्यात आठ उमेदवार दिले होते. पक्षाला तीन जागांवर आघाडी आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पार अजित पवार यांच्यासाठी महाराष्ट्राबाहेर हा पहिला विजय ठरणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात भाजपसोबत असलेल्या राष्ट्रवादीने अरुणाचलमध्ये एकला चलोची भूमिका घेतली आहे.

सिक्कीममध्ये एसकेएमची जादू

सिक्कीम राज्यात सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने विरोधकांचा सुपडा साफ केला आहे. या पक्षाला राज्यात 32 पैकी 31 जागांवर विजय मिळताना दिसत आहे. आतापर्यंत पाच उमेदवार विजयी घोषित करण्यात आले आहेत.

प्रमुख विरोधी सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटला केवळ एका जागेवर आघाडी आहे. मागील निवडणुकीत एसकेएमला 17 तर एसडीएफला 15 जागा मिळाल्या होत्या. यावेळी मात्र एसकेएमने विरोधकांना धूळ चारली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा मिळवत एसकेएम इतिहास घडवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विधानसभा निकाल २०१९

अरुणाचल प्रदेश - 60

भाजप – 41

संयुक्त जनता दल – 7

एनपीईपी – 5

काँग्रेस – 4

अपक्ष – 2

इतर – 1

सिक्कीम - 32

सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा – 17

सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट - 15

Arunachal Pradesh Sikkim Result
PM Narendra Modi : ‘एक्झिट पोल’चे अंदाज येताच मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, संधीसाधू 'इंडी' आघाडी..!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com