Mamata Banerjee On Amit Shah Call: तर मी राजीनामा देईल... ममता बॅनर्जींचे सत्ताधाऱ्यांना खुले आव्हान

Mamata Banerjee On Amit Shah Call : अमित शहांना चार वेळा फोन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात..
Mamata Banerjee Latest News
Mamata Banerjee Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Mamata Banerjee On Amit Shah Call | तृणमुल काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षाला राष्ट्रीय दर्जा परत मिळावा यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन केला होता, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर खुद्द ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. '' तृणमुल काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा परत मिळावा यासाठी मी अमित शहा यांना फोन केल्याची बाब खरी ठरली तर मी राजीनामा देईल. असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. (So I will resign... Mamata Banerjee's open challenge to the rulers)

तृणमूल काँग्रेसला (Trinmool Congress) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी अमित शहांना चार वेळा फोन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. पण मला भारतीय राजकारण चांगलेच कळते. आमच्या चार आमदारांना अटक केली आहे. अशा अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असून ज्यांनी या अफवा पसरवल्या आहेत त्यांना माफी मागायला लावू, असा इशाराही ममता बॅनर्जी यांनी दिला आहे.

Mamata Banerjee Latest News
Congress News : धक्कादायक : काँग्रेस महिला अध्यक्षाचा दोन नेत्यांकडून छळ ; राहुल गांधींनी दखल न घेतल्यामुळे महिला आयोगाकडे धाव..

केंद्रीय एजन्सीसोबत मिळून हे सर्वजण माझ्याविरोधात कट रचला जात आहे. हे लोक सरकारच्या पैशावर निवडणूक लढवतात.भाजप हा देशातील सर्वात भ्रष्ट पक्ष आहे. आम्ही राष्ट्रीय पक्ष होतो, आहोत आणि राहणार आहोत. आम्ही न्यायालयाचा पूर्ण आदर करतो. पण माझी जनतेला विनंती आहे की, भाजपच्या जाळ्यात अडकू नका. भाजप देशातील लोकांना आपापसात लढवत आहे, असही त्यांनी म्हटलं आहे.

Mamata Banerjee Latest News
Uddhav Thackeray news : शिवसेनेत महिलांचे जोरदार इनकमिंग!

कोणाच्याही मेहरबानीमुळे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेला नाही. आम्ही भाजपला विरोध करतो म्हणून आमचे इतके आमदार-खासदार निवडून आले नाहीत. माझ्या पक्षाचे नाव ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप 200 जागांचा आकडा पार करू शकणार नाही, असा खुला इशाराही ममता बॅनर्जी यांनी दिला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com