लखनऊ : गॅंगस्टार अतिक आणि अशरफ अहमद यांच्या खूनप्रकरणी (murder) मोठी कारवाई करण्यात आली आहे. कामात निष्काळजीपणा केल्याबद्दल शाहगंज पोलिस ठाण्यातील पाच पोलिसांना (Police) निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये शहागंज पोलिस ठाण्याचे प्रभारी प्रमुख, दोन पोलिस उपनिरीक्षक आणि दोन हवालदार यांचा समावेश आहे. अतिक आणि अशरफ यांच्यावर हल्ला झाला, त्या ठिकाणापासून पोलिस स्टेशन अवघे १०० ते १५० मीटर अंतरावर आहे. (Big news in Atique-Ashraf Ahmed murder case : Five policemen of Shahaganj Thane suspended)
अतिक आणि अशरफ यांची १५ एप्रिल रोजी प्रयागराज येथे वैद्यकीय तपाणीसाठी नेत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला हेाता. त्यांना गोळ्या झाडून या दोन्ही भावांचा खून करण्यात आला होता. घटनेच्या चार दिवसांनंतर यूपीच्या गृह विभागाने या प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी निष्काळजीपणा केल्याप्रकरणी शहागंज पोलिस ठाण्यातील पाच पोलिस कर्मचान्यांना निलंबित करण्यात आले आहे.
ज्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे, त्यात शहागंज एसओ अश्वनी कुमार सिंह यांच्याशिवाय दोन फौजदार आणि दोन हवालदारांचा समावेश आहे. ज्या ठिकाणी अतिक आणि अश्ररफ यांच्यावर हल्ला, त्या ठिकाणापासून शाहगंज पोलिस ठाणे अवघे १००-१५० मीटर अंतरावर आहे. एसआयटीने मंगळवारी दुपारी एसओसह सर्व पोलिस कर्मचाऱ्यांची या हत्याकांडाबाबत चौकशी केली होती. यानंतर एसआयटीच्या अहवालाच्या आधारे सर्वांवर कारवाई करण्यात आली आहे. (Latest Political News)
अतीक अहमद आणि अशरफ यांना पोलिस प्रयागराजमधील कोल्विन रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जात होते. तेव्हा प्रसारमाध्यमांच्या भूमिकेत असलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि ते जागीच ठार झाले. खून केल्यानंतर ‘जय श्री रामचा’ नारा देत हल्लेखोरांनी लगेच आत्मसमर्पण केले. तिघांनाही बुधवारी (ता.१९ एप्रिल) प्रयागराज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांनाही चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
हल्लेखोर दुचाकीवरून घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावरून पोलिसांनी तीन बंदुका आणि अनेक काडतुसेही जप्त केली आहेत. हल्लेखोरांकडे डमी कॅमेरे आणि मीडियाचा माइक आयडी होता, त्यामुळे त्यांचा संशय येऊ शकला नाही. दोघांची हत्या झाली त्यावेळी ते पोलिस कोठडीत होते. (Political Breaking News)
मोठा माफिया बनण्यासाठी मारले
अतिक आणि अशरफ यांना गोळ्या घालणारा शूटर लवलेश तिवारी हा बांदा येथील रहिवासी आहे, तर अरुण मौर्य हा कासगंजचा रहिवासी आहे. तर तिसरा आरोपी सनी हा हमीरपूरचा रहिवासी आहे. पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. 'छोटे शूटर्स म्हणून किती दिवस राहणार. आम्हाला मोठा माफिया व्हायचे आहे, त्यामुळेच हे हत्याकांड घडवण्यात आले', असे त्यांनी पोलिस तपासात सांगितले आहे. या प्रकरणाती अनेक धागे हळूहळू उघत आहेत. पोलिसही तपासात गुंतले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.