Ayodhya Ram Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (ता. 22) अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाना झाली. रामजन्मभूमी मंदिरात वैदिक मंत्रोच्चाराने रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची सांगता झाली. राम मंदिर आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी 'आज खऱ्या अर्थाने भक्तांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. ज्यांनी राम मंदिरासाठी रक्त आणि घाम गाळला त्यांच्यासाठी हा खूप मोठा क्षण आहे,' असे मत उभा भारती यांनी यावेळी व्यक्त केले.
भारताच्या इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला आहे. या अभिषेक सोहळ्यात देशभरातून आणि जगभरातून 7 हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते.
या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यादरम्यान राम मंदिर आंदोलनात संघर्ष करणाऱ्या उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा राम मंदिर सोहळ्यात भेटल्या तेव्हा त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि भावुक झाल्या. त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या अश्रूंनी संघर्षाची संपूर्ण कहाणी सांगितली. एक चित्र हजार शब्दांचे असते असे म्हणतात. पण हे एक चित्र राम मंदिर आंदोलन, भक्तांचे बलिदान, आक्रमकांचे अत्याचार आणि आपल्या रामाचे मंदिर व्हावे, यासाठीची तपश्चर्या केलेल्या संत-मुनींची संपूर्ण कहाणी सांगत आहेत.
6 डिसेंबर 1992 ला कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली. त्यानंतर उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा या दोघांनाही बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, विनय कटियार, अशोक सिंघल, गिरीराज यांच्यासह भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांसह आरोपी करण्यात आले होते. आज अयोध्येत प्राणप्रतिष्ठापना सोहळा झाला. रामलल्ला आज अयोध्येत विराजनाम झाले. मात्र, राम मंदिरासाठी आंदोलन करणाऱ्या प्रमुख नेत्यांसह दोन महिला नेतृत्वाचादेखील आंदोलनात समावेश होता. राम मंदिराचा संदेश घराघरात पोहोचवण्यात उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा यांच्या जबरदस्त भाषणांचा मोठा वाटा आहे.
'एएनआय'शी बोलताना साध्वी ऋतंभरा म्हणाल्या की, राम मंदिर आंदोलनादरम्यान प्रभू रामाने मंदिरासाठी लढत राहण्याची हिंमत आणि क्षमता दिली होती. या सोहळ्यात सहभागी झालेले सर्व लोक भाग्यवान आहेत. माझ्या मनातली भावना मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.'
Edited By : Rashmi Mane
R...