"असली आ रहा है, नकली से सावधान!" अयोध्येत शिवसेनेची पोस्टरबाजी

Shivsena | MNS : राज ठाकरेंचाही अयोध्या दौरा
Shivsena Ayodhya
Shivsena Ayodhya Sarkarnama
Published on
Updated on

(Aditya Thackeray Ayodhya Visit)

मुंबई : महाराष्ट्रात हनुमान चालिसा विरुद्ध मशिदींवरील भोंगे असे वातावरण तापले असतानाच दोन दिग्गज नेत्यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा झाली आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे येत्या ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तर त्यापाठोपाठ लगेच १० जून रोजी शिवसेना (Shivsena) नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aditya hackeray) हे देखील अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. आज शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या तारखेची घोषणा केली. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासोबत पक्षाचे इतर नेते आणि खासदार देखील असण्याची शक्यता आहे.

अशातच शिवसेनेने अयोध्येमध्ये तयारीला सुरुवात केली असून काही स्थानिक शिवसैनिकांनी अयोध्येमध्ये असली विरुद्ध नकली असे बॅनर्स लावले आहेत. यात "असली आ रहा, नकली से सावधान" असा उल्लेख असलेले बॅनर्स शिवसेनेच्या वतीने लावण्यात आली आहेत. यावर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो देखील लावण्यात आले आहेत. हे पोस्टर्स सध्या अयोध्येसह राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे.

Shivsena Ayodhya
IPS अधिकारी कृष्णप्रकाश यांची संपत्ती किती? ही घ्या यादी...

दरम्यान या पोस्टर्सवर बोलताना शिवसेना संजय राऊत म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये असली आणि नकली अशा प्रकारचे पोस्टर्स कोणी लावले हे माहिती नाही. पण उत्तर प्रदेशची जनता सुजाण आहे. कोणाचा दौरा कोणत्या कारणासाठी होतो, हे त्यांना समजतं, असं संजय राऊत म्हणाले. आमचा हा राजकीय दौरा नाही, असंही ते म्हणाले.

Shivsena Ayodhya
हिंदुहृदयसम्राट, धर्मवीर हे जनता ठरवत असते; ते मागून मिळत नाही : उद्धव ठाकरे

राज ठाकरेंच्या दौऱ्याला शुभेच्छा :

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपचे उत्तरप्रदेशचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी विरोध दर्शविला आहे. यूपीतल्या जनतेची माफी मागितल्या शिवाय राज ठाकरेंना अयोध्येत प्रवेश देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय 'उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरेंना अयोध्येच्या सीमेवर येऊ देणार नाही. राज ठाकरेंनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून तमाम उत्तर भारतीयांची माफी मागावी'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com