Azam Khan News : लोकांच्या घरांवर बुलडोझर चालवणाऱ्या आझम खान यांना 10 वर्षांचा तुरुंगवास

Dungarpur Case Conviction : सरकारी जमिनीवर बेकायदेशीर घरं बांधल्याचे कारण देत त्यांना जबरदस्तीने घराबाहेर काढणे, तोडफोड, मारहाण असे गंभीर गुन्हे खान यांच्यावर दाखल करण्यात आले होते.
Azam Khan
Azam KhanSarkarnama

Uttar Pradesh Politics : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) अखेरच्या टप्प्यातील मतदानाच्या दोन दिवस आधीच समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे दिग्गज नेते आझम खान (Azam Khan News) यांना रामपूर येथील एमपी-एमएलए कोर्टाने एका केसमध्ये दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच 14 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. ते सध्या सीतापूर येथील जेलमध्ये आहेत.  

डूंगरपूर येथील पोलिस (Police) ठाण्यात दाखल गुन्हात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. खान यांच्यासह बरकत अली ठेकेदार यांनाही सात वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. डूंगरपूर येथील एका वस्तीतील लोकांना घरातून जबरदस्तीने बाहेर काढणे, धमकावणे, मारहाण, तोडफोड करण्याचे आरोप त्यांच्यावर होते. या प्रकरणात कोर्टाने त्यांना बुधवारी दोषी धरले होते. (Azam Khan Conviction)

Azam Khan
Arvind Kejriwal News : केजरीवालांची धडपड थांबेना; सुप्रीम कोर्टाच्या नकारानंतर उचललं 'हे' पाऊल

काय आहे प्रकरण?

डूंगरपूर वस्तीतील अबरार नावाच्या व्यक्तीने आझम खान यांच्याविरोधात डिसेंबर 2016 मध्ये पोलिसांत तक्रार दाखल केली होती. घरात घुसून मारहाण, तोडफोड केल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. घरातून जबरदस्तीने बाहेर काढत घर पाडल्याचा आरोपही अबरार यांनी केला होता. (Latest Marathi News)

योगी सरकारने (Uttar Pradesh Government) या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपासाची सुत्रे हलवली. या प्रकरणी जवळपास डझनभर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तत्कालीन समाजवादी पक्षाच्या सरकारने आझम खान यांच्या इशाऱ्यावर पोलिस आणि सपा कार्यकर्त्यांना घरे बांधून देण्यासाठी डूंगरपूर येथील लोकांची घरे पाडली, असा आरोप करण्यात आला होता. (Latest Political News)

Azam Khan
Manmohan Singh News : मनमोहन सिंग यांचे मोदींवर टीकास्त्र; म्हणाले, पदाची प्रतिष्ठा कमी करणारे पहिले पंतप्रधान...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com