Badlapur Protest : बदलापूर घटनेनंतर महाराष्ट्र विरूध्द कोलकाता पोलिस; ममतांच्या खासदारांचा भडका  

Mahua Moitra Kolkata Rape Murder Case : कोलकाचा बलात्कार-हत्या प्रकरणानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात असून ममता सरकारविरोधात रोष वाढत आहे.
Mahua Moitra, Maharashtra Police
Mahua Moitra, Maharashtra PoliceSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : बदलापूरमधील एका शाळेत दोन लहान मुलींवर अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर मंगळवारी मोठा उद्रेक झाला. कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळलेली असतानाच बदलापूरची घटना घडल्याने हा रोष अधिकच वाढला आहे. पण आता यामुळे महाराष्ट्र पोलिस विरूध्द कोलकाता पोलिस अशी तुलना सुरू झाली आहे.

कोलकाता घटनेत पोलिसांच्या भूमिकेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. गुन्हा दाखल करण्यास विलंब केल्याचा आरोप होत असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. बदलापूर घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केल्याचा आरोप होत आहे. तसेच मंगळवारी आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जनंतरही वाद निर्माण झाला आहे.

Mahua Moitra, Maharashtra Police
Champai Soren : ऑपरेशन लोटस फेल? दिल्लीतून परतलेल्या चंपई सोरेन यांची नवी इनिंग...

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी याच मुद्यांवरून महाराष्ट्र आणि कोलकाता पोलिसांची तुलना केली आहे. तसेच महाराष्ट्र सरकार आणि भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. महुआ यांनी यासंदर्भात ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. कोलकाता पोलिसांच्या भूमिकेवर सातत्याने होत असलेल्या टीकेनंतर महुआ यांनी आपला संताप यामाध्यमातून व्यक्त केला आहे.

महुआ यांनी म्हटले आहे की, आरजी कार केसमध्ये कोलकाता पोलिसांनी काही तासांतच आरोपील अटक केली. महाराष्ट्रात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठीही काही दिवस लावले. ही खरी लोकशाहीविरोधी आघाडी आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल दिल्लीला का गेले नाही?, बदलापूरचे प्रकरण सीबीआयकडे का दिले नाही? ईडी आणि सीबीआय केवळ विरोधक आणि विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांसाठी आहे का?, असे सवाल करत महुआ यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर टीका केली आहे.

Mahua Moitra, Maharashtra Police
Pooja Khedkar: पूजा खेडकर यांना 'या' तारखेपर्यंत अटक करता येणार नाही, कोर्टानं सांगितले कारण...

बदलापूरमधील एका शाळेत काही दिवसांपूर्वी तेथील कर्मचाऱ्याने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी तक्रार घेऊन आरोपीला अटक करण्यास विलंब केल्याचा आरोप पालकांनी केली आहे. शाळा प्रशासन आरोपीला वाचवत असल्याचा दावाही पालकांनी केला होता. त्यानंतर मंगळवारी पालकांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि बदलापूर रेल्वे स्थानकात मोठे आंदोलन उभे राहिले. तब्बल आठ ते नऊ तास रेल्वेट्रॅक बंद होता. पोलिसांनी लाठीचार्ज करून सायंकाळी आंदोलकांना पांगवले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com