Dhirendra Shastri : बागेश्वर बाबा पुन्हा बरळले ; तुकोबारायानंतर आता साईबाबांविषयी उधळली मुक्ताफळे

Dhirendra Shastri controversial statment over sai baba : जबलपूर येथील एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले आहे.
Dhirendra Shastri controversial statment over sai baba
Dhirendra Shastri controversial statment over sai babaSarkarnama
Published on
Updated on

Dhirendra Shastri controversial statment over sai baba : देशातील राष्ट्रपुरुष, साधुसंत यांच्याविषयी वादग्रस्त विधान करण्याचे सत्र सुरुच आहे. काल (शनिवारी) कोल्हापुरात कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे.

हे प्रकरण ताजे असतानाच बागेश्वर बाबा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. जबलपूर येथील एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले आहे.

यापूर्वी बागेश्वर बाबांनी संत तुकाराम महाराज यांच्याविषयीही वादग्रस्त विधान केलं होते. त्यावेळीही त्यांच्यावर टीका झाली होती. त्यानंतर त्यांनी आपले विधान मागे घेतलं होते. त्यांनी माफी मागितली होती.

Dhirendra Shastri controversial statment over sai baba
NCP Sarpanch Murdered : NCP सरपंच प्रवीण गोपाळे खूनप्रकरणी मोठी अपडेट ; चार संशयित ताब्यात.

बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा यांनी आता शिर्डीच्या साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

"संताची पूजा करायची तर हिंदूंमध्ये संत कमी आहेत का? तुलसीदास, सूरदास किंवा इतर कोणतेही संत असोत ते केवळ महापुरुष आहेत, युगपुरूष आहेत, परंतु ते ईश्वर नाहीत. त्याचप्रमाणे साईबाबा हे संत असू शकतात, फकिर असू शकतात. मात्र, ईश्वर नाही," असे ते म्हणाले.

Dhirendra Shastri controversial statment over sai baba
Uttar Pradesh Politics : बसपाच्या दलित व्होट बॅकेवर सपाचा डोळा ; अखिलेश यादवांची रणनीती ठरली..

"शिर्डीच्या साईबाबांची पूजा करावी की नाही," असा प्रश्न एका भक्तांने बागेश्वर बाबांना विचारला होता. त्याला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं.

"शंकराचार्य यांनी साई बाबांना ईश्वराचे स्थान दिलेले नाही. शंकराचार्य यांचे मत मानणे अनिवार्य आहे. त्यांच्या मताचे पालन करणे प्रत्येक सनातनी व्यक्तीचे कर्तव्य आहे. कारण शंकराचार्य हे धर्माचे पंतप्रधान आहेत. कोणतेही संत ते आपल्या धर्माचे असोत अथवा दुसऱ्या त्यांना ईश्वराचे स्थान देता येणार नाही," असेही ते म्हणाले.

"गीदड की खाल ओढकर कोई शेर नही बन सकता" (गिधाडाची चामडी पांघरून कोणी सिंह होत नाही.) मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत. परंतु मी हे बोलणेदेखील गरजेचे आहे," असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com