Bahujan Samaj Party : उत्तर प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात 'बहुजन समाज पार्टी'ची मोठी घोषणा!

BSP Mayawati News : मायावतींनी पहिल्यांदाच पोटनिवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे आणि त्यासाठी पक्षाकडून नियोजनबद्ध कामही सुरू झालं आहे
Bahujan Samaj Party
Bahujan Samaj Party Sarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh Assembly By-Election : बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी पहिल्यांदाच पोटनिवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांच्या पक्षाकडून नियोजनबद्ध कामही सुरू करण्यात आले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसपामध्ये काही फेरबदल करण्यात आले आहेत.

बसपाने आपले ज्येष्ठ पदाधिकारी मुनकाद अली यांना मेरठ विभागाच्या प्रभारी पदावरून हटवले आहे आणि काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. यावरून स्पष्ट होत आहे की, उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीत बसपा संपूर्ण ताकदीनिशी आपल्या नव्या टीमसोबत मैदानात उतरणार आहे.

बसपाने(BSP) या दृष्टीने फेरबदल करणे सुरू केले आहे. सर्वात आधी माजी खासदार मुनकाद अली यांना मेरठ विभागाच्या प्रभारी पदावरून हटवले आहे. विशेष म्हणजे मुनकाद अली हे मायावती यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. मनुकाद अली यांना आता माजी खासदार गिरीश चंद्र जाटव यांच्यासोबत बरेली मंडळ, सहारनपूर मंडळ आणि मुरादाबाद मंडळाची जबाबदारी दिली गेली आहे. विधानसभा निवडणुकीआधी माजी खासदार मनुकाद अली यांना हटवलं गेल्याने, संघटनेत मोठ्याप्रमाणात चर्चा सुरू आहेत. मोहित जाटव आणि जगरूप जाटव यांना मेरठ जिल्हा प्रभारी बनवलं गेलं आहे.

Bahujan Samaj Party
Mayawati : मायावतींचं ठरलं; काँग्रेस अन् अखिलेश यांच्या पक्षाबाबत घेतला मोठा निर्णय

बसपा एकीकडे संघटनेत फेरबदल करत आहे, तर दुसरीकडे पक्षातून बाहेर काढलेल्यांनाही पुन्हा परत आणताना दिसत आहे. यामध्ये प्रशांत गौतम यांच्याही नावाचा समावेश आहे. प्रशांत गौोतम यांची नुकतीच घरवापसी झाली आहे. याचसोबत योगेंद्र जाटव आणि प्रशांत गौतम यांना मेरठ मंडळाच्या विविध जिल्ह्यांचे प्रभारी बनवलं गेले आहे. पक्षाच्या धोरणानुसार हे दोन्ही नेते आपली जबाबदारी सांभाळतील. या दोघांचीही मेरठ मंडळात मजबूत पकड असल्याचे बोलले जाते.

उत्तर प्रदेश(Uttar Pradesh) पोटनिवडणुकीत बसपा संपूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे आणि याचे मोठे संकेत फेरबदलांमधून मिळत आहेत. बसपने विभागांसह मंडळांमध्येही फेरबदल केले आहेत. मेरठ मंडळात मोहीत आनंद, प्रशांत गौतम, डॉ. कमल सिंह आणि मुजफ्फरनगर लोकसभा लढवलेले दारा सिंह प्रजापती यांना संयुक्तरित्या मेरठ मंडळाची जबाबदारी दिली गेली आहे.

Bahujan Samaj Party
BJP Politics : भाजप प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते, केंद्रीय मंत्र्यांसह 12 हजार जणांवर कारवाई होणार; काय आहे प्रकरण?

याचबरोबर योगेंद्र जाटव, राजेंद्र कुमार आणि विजय सिंह यांना मेरठ मंडळात मेरठ बागपत आणि हापूड जिल्ह्यातील सर्व कामांची जबाबदारी सोपवली गेली आहे. प्रेमचंद भारती, विनोद प्रधान आणि मेघानंद जाटव यांना बुलंदशहर, गाजियाबाद आणि गौतमबुद्धनगरची जबाबदारी दिली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com