कुनोमध्ये चित्त्यांची एंट्री : भाजप-कॉंग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू ; थोरांतांनी दिला पुरावा

Kuno National Park : कुनो नॅशनल पार्कमध्ये जंगल सफारीस मनाई आहे.
Kuno National Park news update
Kuno National Park news updatesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : नामिबियातील आठ चित्त्यांना (project cheetah) आज भारतात आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या उपस्थित त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये क्वारंटाइन एनक्लोजरमध्ये सोडण्यात आले. चित्ता प्रकल्पावरुन भाजप (bjp) आणि काँग्रेस यांच्यात आता श्रेयवादाच्या लढाईला सुरूवात झाली आहे. (Kuno National Park news update)

"1952 मध्ये आपण चित्ता नामशेष घोषित केले, परंतु त्यांच्या पुनर्वसनासाठी अनेक दशके सार्थक प्रयत्न केले गेले नाहीत. आज स्वातंत्र्याच्या अमृत काळात आता देशात नव्या ऊर्जेने चित्त्यांचे पुनर्वसन होऊ लागले आहे," असे मोदींनी म्हणाले.

"राजकीय दृष्टिकोनातून कोणीही महत्त्व देत नसलेल्या अशा कामामागे आम्ही अनेक वर्षे ऊर्जा खर्च केली. चित्ता कृती योजना तयार केली. आमच्या शास्त्रज्ञांनी नामिबियातील तज्ज्ञांसोबत काम केले. देशभरातील वैज्ञानिक सर्वेक्षणानंतर नॅशनल कुनो पार्कची शुभारंभासाठी निवड करण्यात आली," असे मोदी म्हणाले.

Kuno National Park news update
PM Modi Birthday : कंगना म्हणाली, मोदींजी, तुम्ही राम-कृष्णासारखे अमर आहात !

देशात चित्ता प्रकल्पावरुन भाजप-कॉंग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु आहे. याबाबत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी टि्वट करत या चित्ता प्रकल्पाचा संपूर्ण घटनाक्रमच सांगितला आहे. कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांचा त्या वेळचा चित्त्यांसोबतचा एक फोटोही थोरातांनी शेअर केला आहे.

"डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकारने आफ्रिकेतून चित्ते आणण्यासाठी प्रोजेक्ट चित्ताची सुरुवात केली. तत्कालीन वने आणि पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आता चित्ते भारतात येत आहेत ही आनंदाची बाब आहे," असं टि्वट बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.

काँग्रेसच्या या भूमिकेवर भाजपाने टीका केली आहे. मोदी सरकारला श्रेय मिळू नये यासाठी काँग्रेस नेते धडपड करत आहेत, अशी टीका भाजपनं केली आहे.

Kuno National Park news update
PM Modi Birthday : ७२ वर्षीय मोदींचे ८ वर्षांत ६७ परदेश दौरे ; ३०३६ दिवस सत्तेत असलेले पहिले काँग्रेसेतर पीएम

'प्रोजेक्ट चित्ता'चा थोरातांनी सांगितलेला घटनाक्रम

  • प्रोजेक्ट चीताचा प्रस्ताव २००८-०९ मध्ये तयार झाला. मनमोहन सिंह सरकारने त्याला मान्यता दिली.

  • एप्रिल २०१० मध्ये तत्कालीन वन आणि पर्यावरण मंत्री जयराम रमेश आफ्रिकेतील चीता आउटरीच सेंटरमध्ये गेले.

  • २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयानं प्रकल्पाला स्थगिती दिली. २०२० मध्ये कोर्टाने स्थगिती उठवली. आता चित्ते आणले जात आहेत.

Kuno National Park news update
PM Modi Birthday : ४० मिनिटांत '56 इंच मोदी जी' थाळी संपवा, मिळवा 8.5 लाखांचे बक्षीस

मोदींनी टाळ्या वाजवून केलं चित्त्यांचं स्वागत

आज पंतप्रधानांनी लीव्हरद्वारे बॉक्स उघडला. चित्ते बाहेर येताच अनोळखी जंगलात थोडे थांबले. चित्ते बाहेर येताच पीएम मोदींनी टाळ्या वाजवून चित्त्यांचं स्वागत केलं. मोदींनी काही फोटोही क्लिक केले. 500 मीटर चालत मोदी स्टेजवर पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल मंगूभाई पटेल, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान होते. चित्ता मित्र टीमच्या सदस्यांशीही त्यांनी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवसही आहे. कुनो नॅशनल पार्कमध्ये जंगल सफारीस मनाई आहे.

हे आठ चित्ते मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) ठेवण्यात आले आहेत. 1952 साली भारतातून चित्ते नामशेष झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने 2020 साली भारतात चित्ते आणण्याची परवानगी दिली. त्यानंतर यंदा 2022 मध्ये हा प्रोजेक्ट चित्ता पूर्णत्वास आला आहे. या प्रोजेक्ट चित्ता साठी भारत सरकारने सुमारे 90 ते 92 कोटी खर्च केल्याचं चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com