Sheikh Hasina: शेख हसीना यांचा पाय आणखी खोलात; ICTने उचललं मोठं पाऊलं

Bangladesh International Crimes Tribunal issues second arrest warrant to Sheikh Hasina: पुढील सुनावणी 12 फेब्रुवारी रोजी होणार आहे. चौकशी करुन आरोपपत्र त्याच दिवशी दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे.न्यायाधीश गुलाम मुर्तजा मजूमदार यांच्यासमोर या याचिकेची सुनावणी झाली.
Sheikh Hasina
Sheikh HasinaSarkarnama
Published on
Updated on

Sheikh Hasina:बांग्लादेश इंटरनेशनल क्रिमिनल ट्रिब्यूनलने (ICT) माजी पंतप्रधान शेख हसीना आणि अन्य 11 जणांच्या अटकेसाठी वारंट काढले आहे. यात माजी पोलिस अधिकारी आणि माजी लष्कर जनरल यांच्याशी समावेश आहे. बांग्लादेश इंटरनेशनल क्रिमिनल ट्रिब्यूनलने शेख हसीना यांच्याविरोधात अटक वारंट काढण्याची ही दुसरी वेळ आहे.

शेख हसीना यांनी केलेल्या गैरव्यवहारावर गेल्या वर्षी अवामी लीगने मोठ्या प्रमाणात या विरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. राजीनामा दिल्यानंतर त्यांना बांग्लादेश सोडणे भाग पडले. त्या भारतात आश्रयासाठी आल्या. आईसीटीने आतापर्यंत शेख हसीना यांच्या विरोधात तीन गुन्हे दाखल केले आहेत.

Sheikh Hasina
PF Withdraw via ATM: ATM मधून PF कसा काढता येणार; जाणून घ्या!

ICT के मुख्य वकील मोहम्मद ताजुल इस्लाम यांनी या अकरा जणांवर काय आरोप आहेत, याची माहिती दिली. त्यांना अटकेची मागणी त्यांनी केली आहे. या खटल्याची पुढील सुनावणी 12 फेब्रुवारी रोजी होणार आहे. चौकशी करुन आरोपपत्र त्याच दिवशी दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे.न्यायाधीश गुलाम मुर्तजा मजूमदार यांच्यासमोर या याचिकेची सुनावणी झाली. त्यानंतर अटकेचे वारंट काढण्यात आले.

Sheikh Hasina
Chandrashekhar Bawankule : पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या कशामुळे रखडल्या? बावनकुळेंनी सांगितलं कारण; अजितदादा...

शेख हसीना माजी सरंक्षण सल्लागार मेजर जनरल (सेवानिवृत्त) तारिक अहमद सिद्धिक आणि माजी पोलीस महासंचालक बेनजीर अहमद सहित यांच्यासह अनेक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिद्धिक हे पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर अहमद यांना फरार असल्याचे घोषीत करण्यात आले आहे.

Sheikh Hasina
Congress CWC News : काँग्रेस लागली कामाला; टीम खर्गे सज्ज : तरुण नेत्यांवर मोठी जबाबदारी

बांग्लादेशमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर शेख हसीना देश सोडून पळाल्या आणि त्यांनी भारतात आश्रय घेतला. त्या राजधानी दिल्लीत एका सुरक्षितस्थळी राहत असल्याचे सांगितले जाते. मागील काही महिन्यांपासून त्या भारतात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com