Pooja Khedkar : पूजा खेडकर यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; UPSC, दिल्ली पोलिसांना नोटीस

Delhi High Court Delhi Police UPSC : यूपीएससीच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला.
Pooja Khedkar
Pooja KhedkarSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या पूजा खेडकर यांनी दिल्ली हायकोर्टाने मोठा दिलासा आहे. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणीवेळी कोर्टाने त्यांना तातडीने अटक करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करत यूपीएससी व दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. जामीन अर्जावर 21 ऑगस्ट रोजी सविस्तर सुनावणी होणार आहे.

यूपीएससीने खेडकर यांच्याविरोधात दिलेल्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्यांना अटक केली जाऊ शकते. यापार्श्वभूमीवर खेडकर यांनी दिलीतील स्थानिक कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे.

Pooja Khedkar
VK Pandian : नवीनबाबूंच्या प्रिय ‘व्हीकें’ची हवाई सफर वादात; भाजप सगळंच बाहेर काढणार...

हायकोर्टात न्यायाधीश सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. वरिष्ठ वकील सिध्दार्थ लुथरा यांनी खेडकर यांची बाजू मांडली. तर यूपीएससीकडून नरेश कौशिक हे बाजू मांडत आहेत. खेडकर या अवैध मार्गाने आयएएस व्यवस्थेत आल्या. त्यामुळे त्यांना अटक करणे गरजेचे असल्याचे कौशिक यांनी कोर्टात सांगितले. मात्र, कोर्टाने खेडकर यांना अर्जावर सुनावणी होईपर्यंत अटक करू नये, असे आदेश दिले.

Pooja Khedkar
MP Sanjna Jatav : खासदार पत्नीच्या सुरक्षेसाठी पोलिस हवालदार पती तैनात! काय आहे प्रकरण?

खेडकर यांना तातडीने अटक करण्याची गरज नसल्याचे सांगत कोर्टाने 21 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे तोपर्यंत तरी खेडकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 21 तारखेला त्यांच्या जामीनावर कोर्टाकडून निकाल दिला जाऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com