Bangladesh Crisis : बांगलादेशवर करडी नजर, पण भारतीयांना लगेच परत आणणार नाही! सरकारकडून स्पष्टीकरण

All Party Meeting Congress BJP : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या भारतात आल्या आहेत. तिथे अंतरिम सरकार स्थानपनेच्या हालचालींना वेग आला आहे.
Narendra Modi, Sheikh Hasina
Narendra Modi, Sheikh HasinaSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : बांगलादेशमधील हिंसाचार आणि राजकीय उलथापालथीनंतर मंगळवारी केंद्र सरकारने दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत तेथील सद्यस्थिती तसेच भारताच्या भूमिकेबाबतची माहिती सर्वपक्षीय नेत्यांना देण्यात आली.

परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी बैठकीत भारताची भूमिका स्पष्ट केली. बांगलादेशात जवळपास 13,000 भारतीय आहेत. परिस्थिती इतकी भीषण नाही की तिथे अडकलेल्या नागरिकांना लगेच बाहेर काढावे लागेल, असे जयशंकर यांनी बैठकीत सांगितले.

Narendra Modi, Sheikh Hasina
Supreme Court : आमदार अपात्रता सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी अजितदादांच्या वकिलांना चांगलंच सुनावलं; न्यायालयात नेमकं काय घडलं?

त्याचप्रमाणे 8,000 विद्यार्थी आतापर्यंत देशात परतले आहेत. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. परिस्थिती कशीही असेल, आम्ही ती आपल्या सर्वांना कळवू, असे सांगत जयशंकर यांनी बांग्लादेशवर भारताची करडी नजर असल्याचे स्पष्ट केले.

शेख हसीना यांचे काय?

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी पलायन केल्यानंतर भारतात आश्रय घेतला आहे. गाझियाबादमधील हिंडन हिंडन कडकोट बंदोबस्तामध्ये त्या थांबल्याचे समजते. पुढील काही दिवस त्या भारतातच थांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, केंद्र सरकारने याबाबत भूमिका स्पष्ट करताना शेख हसीनांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे बैठकीत सांगितले.

Narendra Modi, Sheikh Hasina
Jammu and Kashmir Assembly Election : 'जम्मू-काश्मीरमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक' ; 'या' केंद्रीय मंत्र्याचं मोठं विधान!

बैठकीत केंद्रीय मंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांच्यासह लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार के. सी. वेणुगोपाल द्रमुकचे टीआर बालू, जेडीयूचे लल्लन सिंग, सपाचे राम गोपाल यादव, टीएमसीचे सुदीप बंदोपाध्याय, आरजेडीच्या मिसा भारती, बीजेडीचे सस्मित पात्रा, एनसीपी (SP) च्या सुप्रिया सुळे आदी नेते या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान, विरोधकांनी सरकार पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com