Bangladesh currency : बांगलादेशात चलनी नोटांवरून शेख मुजबुर यांचा फोटो हटवला; आता अल्पसंख्यांकांना खूश करण्याचा प्लॅन!

Bangladesh removes Sheikh Mujibur’s photo from currency -जाणून घ्या, शेख युनूस सरकारने नेमका काय निर्णय घेतला आहे? ; बांगलादेशच्या या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
Muhammad Yunus
Muhammad YunusSarkarnama
Published on
Updated on

Sheikh Mujibur Rahman's Photo Removed from Bangladeshi Currency भारताचे शेजारील राष्ट्र बांगलादेशमध्ये सत्ता परिवर्तनानंतर कायमच अस्थिरतेचे वातावरण राहिलेले आहे. युनूस सरकारची कारकिर्द कायमच वादाच्या भोवऱ्यात अंकलेली दिसते. सुरूवातीस अल्पसंख्याकांवर झालेले अत्याचार आणि पसरलेली अराजकता यामुळे बांगलादेश चांगलाच अडचणीत सापडला. नंतर अंतर्गत कलह देखील उफाळून आला व युनूस यांनाही सत्ता सोडावी लागलतील असे चिन्ह आहेत.

एकीकडे ही परिस्थिती असताना आता बांगलादेशच्या अंतरिम सरकारने आपल्या एका नवीन निर्णयातून अल्पसंख्यांकाना खूश करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. कारण, बांगलादेशात आता नवीन चलनी नोटा जारी केल्या गेल्या आहेत. मात्र या नोटांवर आता बांगलादेशचे संस्थापक व माजी पंतप्रधान मुजीबुर रहमान यांचेच छायाचित्र नसणार आहे. आता त्याच्या जागी हिंदू मंदिरांसह बौद्ध धर्माच्या पवित्र स्थळांसह बांगलादेशातील महत्वपूर्ण ठिकाणाचेही छायाचित्र असणार आहे. 

शेख मुजबुर रहमान हे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे वडील होते आणि त्यांचा फोटो बांगलादेशच्या चलनावर आतापर्यंत छापला जायचा. तर मागील वर्षीच बांगलादेशच्या बँकेने घोषणा केली होती की ते नवीन चलनी नोटा जारी करण्यावर काम करत आहेत.

Muhammad Yunus
NCP Pune leadership : महापालिका रणसंग्रामासाठी पुण्यात राष्ट्रवादीचा 'डबल डाव' ; नवे नेतृत्व अन् नवी रणनीती!

बांगलादेश बँकेचे प्रवक्ते आरिफ हुसेन खान यांनी एएफपी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, नवीन चलन बांगलादेशताली नैसर्गिक साधनसंपती आणि ऐतिहासिक स्थळे प्रदर्शित करण्यावर लक्ष केंद्रीत करते. नवीन नोटांवर मानवी प्रतिमा नसतील तर त्याऐवजी पारंपारिक पवित्र स्थळं असतील.

Muhammad Yunus
Bihar Assembly Election : ‘APP’चा ‘I.N.D.I.A’आघाडीला झटका; बिहार विधानसभा स्वबळावरच लढवणार!

एएफपीच्या वृत्तानुसार, नोटांमध्ये हिंदू, बौद्ध मंदिरे, दिवंगत झैनुल आबेदीन यांच्या कलाकृती आणि १९७१च्या स्वातंत्र्ययुद्धात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहणारे राष्ट्रीय शहीद स्मारक यांच्या प्रतिमा असतील. बांगलादेशने तीन वेगवेगळ्या मूल्यांच्या नोटा जारी केल्या आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com